Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

भक्ताचे भगवंता मध्ये सामावणे ©️

भक्ताचे भगवंता मध्ये सामावणे ©️

सद्गुरूंच्या आदेशानुसार जी ज्योत वागेल, त्याचे कोटकल्याण होईल. पण श्रद्धा बलवत्तर असल्याशिवाय एक तत्त्व नाम आपली कधीही गती देणार नाही. म्हणून एकाच तत्वाने, एकच नामाने अनेकांचा उद्धार झालेला आहे. अनेक संतांनी त्याचा उहापोह, त्याचे लिखाण केले आहे, म्हणून ज्याला ज्याची खूण माहिती झाली तरच तो त्यात रममाण होईल. ज्याने हे सर्वस्वाचे निदान ओळखले, तोच ह्यात रममाण होतो. ज्याला याची गती नाही, त्याला याचे काहीच वाटत नाही आणि म्हणून तो फसला जातो. आडमार्गी जातो.

सत भक्तीवर विश्वास नसेल तर तो मोक्ष मुक्तीचा वाटेकरी होणार नाही. जो मायेच्या आधीन बनतो, तो त्याच तत्वाकडे खेचला जातो आणि अशा रीतीने अघोर मायेच्या पूर्ण आधीन बनल्यानंतर खंदकात बुडतो. सत भक्तीने माझी ओळख करून घेणे इतके सोपे आहे, तितकेच ते कठीणही आहे. त्यात जो टिकेल, तो निभावून जाईल, रममाण होईल, तो माझ्यापासून कोठेही जाणार नाही. अशा भक्ताला माझ्यात सामावून घ्यावे लागते. ©️

You cannot copy content of this page