श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज –
भक्ती हा एक मोठा राजमार्ग आहे. त्यात काटेकुटे, खाचखळगे काही नाहीत. परंतु तामसी वृत्तीच्या मार्गात काटेकुटे, खाचखळगे सर्वच आहे. त्यातून तरला तर ठीक, नाहीतर गेला खड्ड्यात! परंतु भक्तिमार्ग मात्र साधा सरळ आहे.
आता आपण जाणताच की वेगवेगळी शुद्धीकरणे आपण पाहीलीत, अनुभवलीत. या शुद्धीकरणात आपणा सर्वांना हे कळून चुकले होते की अघोरांकडे वेगवेगळे वरदहस्त, अमरत्व अशा वेगवेगळ्या गोष्टी होत्या. एवढेच काय त्यांच्याकडे अमृत व संजिवनी देखील होती. अशा ज्योतींना शुद्धीकरणात कसे घ्यावे असा आमच्यापुढे प्रश्न होता. परंतु शुद्धीकरणासाठी आम्हाला मार्गदर्शन कोणी केले तर सताने !
जरी अघोरांना वरदहस्त होते तरी बाजू सताचीच घेतली. जरी कोणी कितीही आटापिटा केला तरी बाजू सताचीच घेणार. परंतु अशी वेळ आली की अघोर सताला डोईजड होत आहे असे आम्हाला शुद्धीकरण करताना वाटू लागले. त्यावेळी आम्हाला मार्गदर्शन कोणी केले तर सताने! शेवटी सत बाजू कोणाची घेते तर सात्विकांचीच! सत सताचीच बाजू घेणार, अघोरांची बाजू कधीही घेणार नाही. कधी कधी आपण पाहतो, अनुभवतो की सात्विक ज्योती देखील चिडतात…©️
