Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

गरीबाची किंमत काय कळणार ©️

गरीबाची किंमत काय कळणार ©️

श्री समर्थ मालिक – मोहाला बळी पडणाऱ्या ज्योती या पुष्कळ आहेत. सत्यासाठी जगणाऱ्या ज्योती व्यासपीठावर अजून उभ्या राहिल्या नाहीत. त्यांना कोणी पुढे येऊ देत नाही. याला कारण अघोर आहेत. ही ज्योत अघोरांच्या ओंजळीने पाणी पीत आहे. होते ते चांगल्यासाठी होते. आपल्या आदेशाप्रमाणे हिला संरक्षण दिले होते. या पदावर आलेल्या ज्योती यातच गुरफटून जातात. त्यांना मोह निर्माण होतो. एकदाच बोल दिलेला आहे. दाही दिशांनी या भारतावर चौफेर हल्ले जरी झाले तरी भारत जाऊ देणार नाही. हे त्रिवार सत्य आहे. इतकेच काय तर कित्येकांना शरण आणल्याशिवाय राहणार नाही.

या भूमीत प्रत्येकाची भावना आहे की मी राजा व्हावे. राजा होण्याची इच्छा बलवत्तर आहे. पण राज्य कसे करावे हे समजत नाही. राज्य कारभार कसा चालवावा याचे ज्ञान नाही. उ:षापाचा काळ अगदी जवळ आला आहे. जो करतो तो माझे पुण्यफळ आहे म्हणून करीत नाही. तो कोणाच्या हितासाठी करतो ते त्याला कळलेले नाही. कळेल केव्हा, जेव्हा मस्तकाचे दोन भाग होतील तेव्हा ! म्हणून बाकी बोलण्याची आवश्यकता नाही. होत आहे ते चांगल्यासाठी होत आहे. समस्तांची बुद्धी सुद्धा मायेत गुरुफटली आहे. त्यांना पैसा प्यार आहे. पैशाला जो बळी पडला, त्यांना गरीबाची किंमत काय कळणार आहे? गरीबाला तो काय विचारणार आहे? ©️

You cannot copy content of this page