Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

गुरुपद हेच सद्गुरु ©️

गुरुपद हेच सद्गुरु ©️

श्री समर्थ मालिक – गुरुपदाच्या मुखातून निघालेली अमृततुल्य वाणी झेलने हे प्रत्येक सेवेकऱ्याचे कर्तव्य आहे. एकमेक एकमेकांवर अवलंबून आहेत. आपण मानव आहात. संशयात, षड्रिपूच्या जाळ्यात गुरफटलेले आहात. या सर्वस्वातून सुटका करणारे एक महान श्रेष्ठ पद आहे. तेच हे गुरुपद आहे. त्या गुरुपदाशिवाय सेवेकऱ्यांना वाचविणारे, तारणारे, त्यांचे कोडकौतुक पुरविणारे दुसरे कोणीही नाही.

सद्गुरु आणि सेवेकरी यांचे नाते संबंध फार निराळे आहेत. वेगळे आहेत. आपल्या सेवेकऱ्यांसाठी ते हेलावतात, लयबद्ध होतात. कोणालाही ते दूर लोटित नाहीत. असे हे पूर्णत्वाने दयाघन तत्व आहे. ही दया इतर ठिकाणी आढळणार नाही. सेवेकरी कोणत्याही तऱ्हेचा असो, तो सद्गुरुमय व्हावा अशी त्यांची आंतरिक तळमळ असते.

कर्तव्य केल्यानंतर मुक्ती आणि मोक्ष दूर नाही. आपण जाणते सेवेकरी आहात. ओळखण्याची खूण थोडी आहे, ती ज्याला मिळाली तो धन्य होय. ज्यांना मिळाली नाही, त्यांनाही ती मिळेल. पण हळूहळू कालांतराने. हे सानिध्य मिळायला भाग्य लागते.

सेवेकऱ्यांना सद्गुरु कधीही दूर लोटित नाहीत. दूर जाऊ देत नाहीत. असे हे दोन तत्त्वात भरलेले सद्गुरुपद, याचाच ठाव सेवेकर्‍यांनी घेणे. हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे. प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला सेवेकऱ्याला आपल्या अमृतमय वाणीने सिद्ध करण्यासाठी संदेश देत असतात. ते संदेश सेवेकऱ्यांनी पाळावयाचे असतात. या संदेशांना फार महत्त्व आहे. याचे निवेदन केलेले आहे. जरी सेवेकर्‍यांनी संदेश पाळले नाहीत, तरी सद्गुरु कोपिष्ट होणार नाहीत. त्याला गोड शब्दात समजावून सांगतील. ©️

You cannot copy content of this page