Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

श्री समर्थ मालिक – अघोरांचे खच्चीकरण कसे होते याची कल्पना सेवेकऱ्यांना नाही. त्यांच्या दुष्कृत्यांची भरपाई झाल्यानंतर त्यांची कृती त्यांच्यावरच उलट झाल्यानंतर कार्य …

भक्ती कशी करावी?©️

भक्ती कशी करावी?©️

श्री समर्थ मालिक – मानव स्वतःच्याच कृतीने भटकला जातो. भक्ती कोणत्या तऱ्हेने व कशी करावी? जो सेवेकरी ज्ञानाची अपेक्षा करतो मग विषय कोणताही असो, तो सेवेकरी समजतो व मानतो. बोल सहज सुटत असतात. ते सहज बोल असतात. त्याप्रमाणे आपली वर्तणूक राहिली आहे काय? आपण ती राखली आहे काय? का नाही राखली? ती कोणी राखावयाची?

ज्ञान हे मिळत गेले. कुठून? माझ्याकडून की आसनाधिस्तांकडून? मग त्यांचे आदेश पाळले आहेत का? मनामध्ये आपल्या हृदयात गाठ मारून ठेवले आहेत का? त्यांचे बोल, त्यांचे प्रणव आपल्या हृदयात गाठ मारून ठेवले आहेत का? साधी भाषा आहे. सेवेकऱ्यांचे आद्य कर्तव्य कोणते आहे? निवेदन करतील का?

आद्य कर्तव्य कोणते आहे? कोणत्या तऱ्हेने कर्तव्य पार पाडले पाहिजे? एका व्यक्तीला सर्वजण शरण आहात. एकाच पित्याची लेकरे आहात. ती कशी राहिली पाहिजेत? एका वृक्षाखाली कोणत्या भावनेने बसावे? सेवेकर्‍यांनी सत् भक्तीने बसावे, एकरूप बसावे की वेगळे बसावे? बसला आहात का एकरूप आतापर्यंत?

आसनाधिस्त म्हणतात, घरचा भेदी, बाहेरचा चोर ! तसेच भिंतीला कान असतात. असे का म्हटले आहे? आसनाधिस्तानी कोणावर अवलंबून राहावे? भगवंत भक्तावर अवलंबून असतो व भक्त भगवंतावर अवलंबून असतो, मग आता तुमच्या सद्गुरूंनी किंवा आसनाधिस्तानी कोणावर अवलंबून राहावे? सद्गुरु ज्ञान देतात. तुम्हीच सांगावे आसनाधिस्तांनी कोणावर अवलंबून राहावे? भक्तावर अवलंबून राहावे का? भक्त आसनाधिस्तांचे प्रणव गुप्त ठेवतात का नाही? ©️

You cannot copy content of this page