Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

“विषय तो झाला नारायण” ©️

“विषय तो झाला नारायण” ©️

श्री समर्थ मालिक –

संत मालिकेत संतांनी सांगितले आहे, अनुभवले आहे. तुम्ही ते अनुभवले नाही. व्यक्तिशः आपणास नाही, सर्व सेवेकर्‍यांना आहे. संताने वाक्यरचना केलेली आहे. हल्लीचा काळ वेगळा आहे. सताला त्रास होतो आहे, दिसत आहे, गती मिळत आहे. संताने त्रास सहन करणे व तो त्रास सहन करता करता सतमय बनने. मग त्रास पूर्ण झाल्यानंतर फळ आपोआप मिळत असते.

अघोरांचा त्रास केव्हा व कसा होत असतो, तर अघोर कृती व असत कर्तव्याचा लोंढा डोक्यावरून जाऊ लागल्यानंतर होत असतो. मग कर्तव्य करण्यास वेळ लागत नाही. त्याचा नाश कृतीने होत असतो. हा इतिहास आदिअंता पासूनचा आहे.

मायावी कर्तव्यामध्ये त्रिगुणांनी आडकाठी व खो घातला असेल, तरी देखील सताजवळ, क्षणोक्षणी त्रिगुण निर्माण करण्याची शक्ती आहे. सताजवळ सहनशीलता असते. त्रिगुणांनी दिलेले अधिकार व त्याचा उपभोग अघोरांनी आत्तापर्यंत घेतला आहे. ©️

You cannot copy content of this page