Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

…..हाच स्वर्ग आहे ! ©️

…..हाच स्वर्ग आहे ! ©️

श्री समर्थ मालिक

       जी मूळ माया तिचे व माझे बोलणे होत होते. तिला अनेक वेळा समजावून सांगितले. तो तुझे ऐकणार नाही. तुझ्या सानिध्यात येणार नाही, पण अधिकार बहाल केले ना! त्याचे जोरावर ती म्हणाली, मी पाहते तो कसा फसत नाही. मी म्हटले पहा! पण मी जे करावयाचे ते केले. आपण तिच्या आधीन गेला नाहीत. आपणास पूर्णत्वाने खात्री होती माझे मालिक मला डावलणार नाहीत. माया देऊन देऊन तरी काय देणार? पण जे कधी हटत नाही, तुटत नाही, ही संपत्ती मायेजवळ नाही. तिला कोणीही हिरावून घेणार नाही. ती अदृश्य संपत्ती मालिकच देत असतात.

ही काय देणार आहे म्हणून तिला हार घ्यावी लागली. मला एवढेच सांगायचे की माझी अन तिची जीत लागली होती. पण आपणास त्रास होऊ दिला नाही. सांगून जी ज्योत ऐकत नाही म्हणून तिला सांगितले. दिलेले अधिकार तिला गाजवायचे होते, पण ते कुठे गाजवायचे हे तिला माहीत नाही. पण अखेर ती शरण आली ना? सेवेकरी त्या पात्रतेचा असेल तर तो आपोआप सावध होतो.

मी झोपडीत का असतो? सेवेकरी दिसायला लाचार दिसतो, पण त्याचे घरी मी का असतो? कारण ती ज्योत भक्तीयुक्त असते. आता स्वर्ग म्हणजे काय? इंद्र सभा म्हणजे स्वर्ग की काय? सद्गुरु सानिध्यात, चरणात लीन होणे हाच स्वर्ग आहे. २१ स्वर्ग या तीन ताळामध्येच आहे. ते नंतर सांगेन.©️

You cannot copy content of this page