श्री समर्थ मालिक
सद्गुरू पदोपदी आपणास प्रणव देत असतात की मन सद्गुरू चरणांवर बहाल करा. ज्या सद्गुरूंना शरण आहात तेच सत आहेत. जे सत तेच सद्गुरु ! त्यांच्या मुखातून जे प्रणव मिळत असतात, ते सतमय प्रणव असतात. तेच प्रणव आपल्या सेवेकऱ्यांना कुठपर्यंत पोहोचवतात, तर सत चरणांप्रत पोहोचवतात.
या भूतलावर अराजकता माजली आहे. कलियुगी स्थिती आहे. या कलियुगी स्थितीत किती स्थितीचे गुरु आहेत? सद्गुरु अन गुरु ! जे सद्गुरु आहेत त्यांचे प्रणव सतमय स्थितीचे असतात. तेच सतमय प्रणव सद्गुरु चरणांप्रत नेतात. या स्थानात आल्यानंतर मानवाची जी स्थिती होते, तेच मानव अनेक स्थानातून आलेले असतात.
जे प्रथम प्रणव दिले ते सद्गुरु अन गुरू! जे सद्गुरु सत प्रणव देऊन सत चरणाप्रत नेतात तेच सद्गुरु ! त्यांचा महिमा अगाध आहे. सद्गुरु म्हटल्यानंतर तेथे सगळे लिन असतात. ज्याप्रमाणे सद्गुरु, त्याप्रमाणे सत सेवेकरी ! सेवेकरी त्याच वृत्तीचा पाहिजे. सद्गुरु प्रणव देत असतात, सत वृत्तीने चला. सद्गुरु सत प्रणव देत असतात, म्हणून सेवेकरी सत चरणांप्रत जातात. गुरु अन सद्गुरु ! गुरु मोहमायेत गुरफटलेले असतात. आपल्याला सत मायेत जावयाचे आहे. सत प्रणव सद्गुरुं पासून मिळतात. मग हा महिमा अगाध आहे ना? म्हणून मोहमायेत न जाता सत मायेत जाणे. ©️
