दिनांक:१४. १०. ७५ च्या प्रवचनातून श्री समर्थ मालिक सांगताहेत, “ज्यावेळी या पृथ्वीवर काहीही नव्हते, मग हे उत्पन्न झाले कसे? कोणी केले? याचा कर्ता कोण ? मानवाचे जगताच्या पृष्ठभागावर अस्तित्व असावे म्हणून हे केले. मी जगात वावरतो याचा उहापोह कोणी केला असता? एकच तत्व सर्व ठिकाणी व्यापक आहे.
ओंकार बीज कसे निर्माण झाले कोणी फेकले याची गती मानवाला आहे का? मग ओंकार फेकल्याशिवाय पसारा झाला नाही ना? ओंकार रुपी मायेच्या आतमध्ये माझा वास आहे, मग ती कोणतीही माया असो. सर्व योनीमध्ये माझा वास आहे. कृष्णावतारात मी सांगितले की, मी अनंत नामाने नटलेलो आहे, अनंत रूपाने नटलेलो आहे.
सर्वस्व ओंकार सत्य आहे हे म्हणता येईल. ओंकार सत्य आहे म्हणून हे सर्व सत्य आहे. मानव सर्वस्व आकारी आहेत. ओम स्वरूप आकारी आहे, पण ओंकार स्वरूप मानव बनला का? अशी पुढे ते विचारणा करतात.
बीज नाही, फळ नाही, वृक्षही नाही मग अंडे निर्माण झाले कुठून? बीज नसता अंडे जाहले, तेथे योगी रमले ! ते न पावले पुनर्जन्म ! बीज नसता अंड्याची निर्मिती झाली, मग अगोदर योगी म्हणावे की अंडे म्हणावे?
प्रथम चैतन्य आकार, धुंधुंकार, ओंकार ! ओंकारचे पोटी माया, नंतर त्रिगुण, मग जगाचा पसारा, म्हणून त्यांना प्रथम अंड्यासारखे गोल स्वरूप दाखविण्यात आले. याच्याशिवाय दुसरे काही नाही. अशी त्यांची खात्री झाली. पण ते अंडे कसे होते? पाहिले कोणी? ज्याने पाहिले त्यानेच वर्णन केले. कोणी बिंदू स्वरूप म्हणतो, कोणी काय म्हणतो ! असेच नाही का?
बिंदू जरी असले, तरी ते कसे केवढे? हे कोणीही सांगू शकणार नाही. मसुरेप्रमाणे आहे असे कोणी सांगितले आहे. मला जसे पहाल तसा मी आहे. तरी खरी स्थिती पाहायला गेले, ते सतात रममाण झालेत. असे झाले तर काही एक सांगता येणार नाही, म्हणून जे करून अकर्ते पद आहे ते कोणालाही सांगता येणार नाही. (पुढे सुरु….७) ©️
