दिव्याचे अंगी नाही दुजा भाव | चोर आणि साव सारखाची || काही चोर पण आहेत, काही साव पण आहेत. मी कणाकणात भरलेलो आहे. केव्हाही सोडणार नाही. कोणीही सुटणार नाही. असे काहींनी प्रत्यक्षात अनुभवले आहे. ज्यांनी अनुभवले नाही त्याना काही माहीत नाही.
दिवा म्हणजे कोण? दिवा हा दीनदयाळ आहे. त्याला तुम्ही शरण गेलात. त्यांनी तुम्हाला प्रकाश दिला आहे. तुम्ही प्रकाश स्वतः घेऊन आलेले नाहीत. तोच दिन, तोच दिवा प्रत्यक्ष घडण घडते ती पाहत आहे. असे असताना सेवेकर्यांना वाटते मी कोणीतरी विशेष आहे. पण या ठिकाणी जे घडते ते कोणीतरी पाहते. हे लक्षात ठेवा. सेवेकरी बोलून जातो, घडण घडते. कोणीतरी घडवून घेत असते. त्यांचे कर्तव्य ते घडवून घेत आहेत. सेवेकरी हा नामानिराळा आहे. काही सेवेकरी प्रकाशमान आहेत. सानिध्यात गती घेत आहेत. गती घेत असताना, आसनाधीस्त अन माझे बोलणे चालत असताना मीच शहाणा म्हणून त्याची मान डोलत असते. असे झाले आहे,
तोच सांगत आहे. ही घडण मीच घडवून घेतो. ओळखले आहे तर अनेकात तत्व एकच आहे. त्याही सेवेकऱ्यात मीच आहे. अन् दुसऱ्यातही मीच आहे. असे जर वाटत असते तर त्यांने तसे केले नसते.
क्षमा कोण मागतो? प्रथम चूक करावयाची आणि नंतर क्षमा मागवयाची. क्षमा करा, क्षमा करा. त्या क्षमेला अंतही नाही आणि पारही नाही. ज्या दिनाला शरण गेलात, त्याचे आदेश संदेश पाळणे हे सेवेकर्याचे कर्तव्य आहे. एक दोन अशा कितीतरी चुका आहेत. आता प्रत्यक्षात आसनाधीस्त साताऱ्यात असताना सर्वस्व क्षमेचाच पसारा मांडलेला आहे. म्हणजे तत्त्वात ते रममाण, लिन झालेत का? तत्व ओळखले आहे का? सर्वस्व मनाचा खेळ चाललेला आहे. सानिध्यात दोन-तीन ज्योती आलेल्या आहेत, एकही सुधारत नाही. हे सर्वस्व मालिक करून घेतात असेही काही सेवेकरी म्हणतात. ……… (समाप्त) ©️
