Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

दिव्याचे अंगी नाही दुजा भाव | ©️

दिव्याचे अंगी नाही दुजा भाव | ©️

दिव्याचे अंगी नाही दुजा भाव | चोर आणि साव सारखाची || काही चोर पण आहेत, काही साव पण आहेत. मी कणाकणात भरलेलो‌ आहे. केव्हाही सोडणार नाही. कोणीही सुटणार नाही. असे काहींनी प्रत्यक्षात अनुभवले आहे. ज्यांनी अनुभवले नाही त्याना काही माहीत नाही.

दिवा म्हणजे कोण? दिवा हा दीनदयाळ आहे. त्याला तुम्ही शरण गेलात. त्यांनी तुम्हाला प्रकाश दिला आहे. तुम्ही प्रकाश स्वतः घेऊन आलेले नाहीत. तोच दिन, तोच दिवा प्रत्यक्ष घडण घडते ती पाहत आहे. असे असताना सेवेकर्‍यांना वाटते मी कोणीतरी विशेष आहे. पण या ठिकाणी जे घडते ते कोणीतरी पाहते. हे लक्षात ठेवा. सेवेकरी बोलून जातो, घडण घडते. कोणीतरी घडवून घेत असते. त्यांचे कर्तव्य ते घडवून घेत आहेत. सेवेकरी हा नामानिराळा आहे. काही सेवेकरी प्रकाशमान आहेत. सानिध्यात गती घेत आहेत. गती घेत असताना, आसनाधीस्त अन माझे बोलणे चालत असताना मीच शहाणा म्हणून त्याची मान डोलत असते. असे झाले आहे,

तोच सांगत आहे. ही घडण मीच घडवून घेतो. ओळखले आहे तर अनेकात तत्व एकच आहे. त्याही सेवेकऱ्यात मीच आहे. अन् दुसऱ्यातही मीच आहे. असे जर वाटत असते तर त्यांने तसे केले नसते.

क्षमा कोण मागतो? प्रथम चूक करावयाची आणि नंतर क्षमा मागवयाची. क्षमा करा, क्षमा करा. त्या क्षमेला अंतही नाही आणि पारही नाही. ज्या दिनाला शरण गेलात, त्याचे आदेश संदेश पाळणे हे सेवेकर्‍याचे कर्तव्य आहे. एक दोन अशा कितीतरी चुका आहेत. आता प्रत्यक्षात आसनाधीस्त साताऱ्यात असताना सर्वस्व क्षमेचाच पसारा मांडलेला आहे. म्हणजे तत्त्वात ते रममाण, लिन झालेत का? तत्व ओळखले आहे का? सर्वस्व मनाचा खेळ चाललेला आहे. सानिध्यात दोन-तीन ज्योती आलेल्या आहेत, एकही सुधारत नाही. हे सर्वस्व मालिक करून घेतात असेही काही सेवेकरी म्हणतात. ……… (समाप्त) ©️

You cannot copy content of this page