सेवेकरी सद्गुरु चरणांचे सेवक आहेत. त्याबद्दल मनात वादळ निर्माण झाले म्हणजे मन हेलकावे खाते आणि सद्गुरुना विसरतो, अशा तऱ्हेने तो वाटचाल करतो. सद्गुरुना हे सगळे माहीत असते पण त्याची ते सेवेकऱ्यांना गती देत नाहीत. सद्गुरु कधीही सेवेकर्याला विसरत नाहीत.
जीवनात वादळ निर्माण झाले, तर सद्गुरूंची आठवण ठेवून नामात गुंग झाल्यास काळाचीही भीती नाही. सेवेकऱ्यांना याचा अनुभव आहे. सेवेकर्यांनी विसरता कामा नये. प्रत्येकाच्या पाठीशी चित्घण शक्ती आहे. सेवेकरी तिन्ही अंगाने शरण असावयास पाहिजे. त्याने कशाचीही अपेक्षा करावयाची नाही. त्याला सर्वस्व मिळते. म्हणून सेवेकर्यांनी कष्टी होऊ नये. जे व्हावयाचे आहे ते होईल, त्याने कष्टी व्हावयाचे नाही.
जीवनात वादळ निर्माण झाले तर ते कष्टी होतात, परंतु सेवेकऱ्याने आडमार्गाने न जाता, राजमार्गाने जावे. सद्गुरु आपल्या सेवेकर्याला राज मार्गाने नेण्याची धडपड करतात. सेवेकर्यांनी आपल्या कर्तव्याप्रमाणे वाटचाल करणे. चित्घण शक्ती पाठीमागे आहे. सृष्टीच्या नियमाप्रमाणे जे व्हावयाचे आहे ते होईल. हे कालचक्राप्रमाणे सर्वस्व होत आहे. (समाप्त)©️
