Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

श्री समर्थ मालिक – अघोरांचे खच्चीकरण कसे होते याची कल्पना सेवेकऱ्यांना नाही. त्यांच्या दुष्कृत्यांची भरपाई झाल्यानंतर त्यांची कृती त्यांच्यावरच उलट झाल्यानंतर कार्य …

अनुग्रह देणारे वेगळ्या प्रकारचे अन्…©️

अनुग्रह देणारे वेगळ्या प्रकारचे अन्…©️

श्री समर्थ मालिक – भक्त हा भगवंतावर अन् भगवंत हे भक्तावर अवलंबून असतात. भक्ती प्रेम निर्माण झाले की मनाची चंचलता आपोआप दूर होते. जोपर्यंत मनाची शुद्धता नाही, तोपर्यंत भक्ती ही कठीण वाटते. मन शुद्ध झाले की भक्तीत कठीणता नाही.

सर्वभूतेषु एकच तत्व आहे, पण अनंत रूपे अनंत नामे याने नटलेली महामाया ही नटविली कोणी? तर त्याच महान तत्वाने नटविली आहे.

अनंत रूपामध्ये ही प्रकृती वावरते. जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत ! म्हणून प्रकृती ही अनंत स्वरूपाने नटलेली आहे. तशीच मते सुद्धा भिन्न आहेत.

पूर्वजन्मीचे सानिध्य आहे, त्यामुळे त्याला जरी सद्गुरु दर्शन नसले, तरी मनाला सत् बनविण्याचा प्रयत्न केला तर ते स्थिर होते.

मन हे कोणापासून आहे? प्रकृतीची अंगे वेगवेगळी दाखविलेली आहेत. पण प्रकृतीच्या आतमध्ये एकच तत्व आहे. मग ते एकच तत्व भिन्न प्रकृतीच्या अनुसंधनाने अनुग्रह देण्याचा प्रयत्न करते. ते ही, त्या तऱ्हेची प्रकृती असेल तर उपरती येते. अनुग्रह देणारे वेगळ्या प्रकारचे अन् गुरु वेगळ्या प्रकारचे असे म्हणता येईल का? ©️

You cannot copy content of this page