Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

महाराष्ट्राच्या उद्धारासाठी…©️

महाराष्ट्राच्या उद्धारासाठी…©️

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन केले आहे, सांगितले आहे. शाप संपूर्णपणे नाहीसा झालेला नाही. त्यातून मुक्तता झालेली नाही. उ:शाप दिलेला होता तो संपूर्ण नव्हे, पण संपत आलेला आहे. तो संपल्यानंतर भारतातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात ही महाराष्ट्र भूमी चमकेल. महाराष्ट्र भूमीच्या उद्धारासाठी हे अवतारकार्य महाराष्ट्रात नटवले आहे.

या आसनाचे ठिकाणी अनेक तऱ्हा नटवल्या आहेत. ही भूमी शाप मुक्त करण्यासाठी, अनेक अवतारकार्ये नटवली आहेत, संत निर्मिती केली. तो काळ समीप आला आहे.

या ठिकाणी या भूमीत अघोरांनी धुमाकूळ घातला. ऋषिकुळे गायब केली. त्यांना मुक्त करण्याचे कर्तव्य या आसनाने पार पडले. त्याचाच हा आनंद आहे. ज्यावेळी संपूर्ण शाप मुक्तता होईल, मग संघर्षण अजिबात राहणार नाही.

या आसनाला चकविण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे, पण आसन चकलेले नाही. याचे चक्षुतून काही एक सुटणार नाही,‌ सुटले नाही व सुटू शकणार नाही. आज जरी संघर्षण असले तरी उद्या आनंद होणार आहे. त्यासाठी या आसनाने कर्तव्य शिरावर घेतले आहे. आपण एकमेकांचे सानिध्यात राहून कर्तव्य पार पाडलेले आहे. महान महान असुरांशी संघर्षण करून कित्येक चमत्कारिक कृत्ये उजेडात आणलेली आहेत, त्याचे कारण एकच, सेवेकऱ्यांना दाखवण्यासाठी. ©️

You cannot copy content of this page