Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

होणार हे होणारच ! ©️

होणार हे होणारच ! ©️

श्री समर्थ मालिक – बोल बोलवितो कोण? हे ज्याने ओळखले त्यानेच ओळखले. ज्याने ओळखले नाही तो म्हणतो, “मीच शहाणा आहे.” पण मी मायेला किती मारून, त्याच्याकडून भरपाई करून घेत असतो.

या भारत भूमीमध्ये किती अहंकार मातलेला आहे. त्या अहंकाराने कितीतरी मात केली आहे. गरीब लोकांची काय स्थिती आहे? म्हणून जे कर्तव्य घडवायचे ते घडवून घेणारच ! अन् ते कर्तव्य घडवून घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. मायेकडूनच कर्तव्य घडवून घेणार, त्याशिवाय सत कर्तव्याला उज्वलता येणार नाही. सत कर्तव्याची उज्वलता झाली मग काय होईल ते सांगता येणार नाही.

आता थोडी थोडी सुरुवात झाली आहे. सर्वस्व आपल्या दिसण्यात येईल. मात्र इतकेच आहे, कर्तव्याला सुरुवात कधी आणि केव्हा हे विचारावयाचे नाही. आपल्याला मागेच संदेश दिलेले आहेत. होणार हे होणारच ! ते चुकणार नाही. सेवेकऱ्यांनी घाबरू नये. हे घडल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून आपल्या कर्तव्यात जागृत राहणे. म्हणून तुकारामाच्या बोलाप्रमाणे, “कोण? हे ओळखावे !” हे सेवेकऱ्यांनी ओळखून जागृत राहावे. ©️

You cannot copy content of this page