Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

स्वयंभू ! (२) ©️

स्वयंभू ! (२) ©️

त्यांची अर्धांगिनी आली होती. जाणीव घेतली होती ना? ती दर्शना करता आली होती. जर या शक्तीला पाहू शकला नाहीत, तर पुढें वाटचाल कशी करणार? ही शक्ती दर्शना करता आली होती. काही त्यांचे उपासक आले आहेत. परंतु ह्या दरबारात कोणाचे काहीच चालणार नाही. त्यांना वाटत असेल की, हा दरबार मामुली आहे, ऋद्धीं सिध्दी आहेत, चमत्कार नमस्कार आहे, परंतु तसेही नाही. हा दरबार कसून पाहणारा आहे व सेवेकऱ्यानाही कसून घेणारा आहे.

सेवेकऱ्यानाही जर शक्तीची जाणीव घेता आली नाही, तर पुढे महान महान सत् पुरुष यांची जाणीव कशी घेणार? अजून स्वतःच्या गाठचे काही नाही. यापुढे तरी सावधगिरीने वाटचाल करा. कोण आले गेले त्याकडे नीट लक्ष द्या आणि ताबडतोब आसनाधिस्तां जवळ सांगा. नाहीतर पार्वती लक्ष्मी सारख्या शक्त्या माहित आहेत तुम्हाला? केव्हां चटदिशी येऊन आग लावतील याचा पत्ता नाही. त्याची फळे मग कोण भोगणार?

या सेवेेकऱ्याना जर कार्याला पाठविले, तर असेच चोख कार्य करतील काय? मग त्यांची पाहणी नको का करायला? त्या शक्तीची वटवट चालत नाही. परंतु सेवेकऱ्याना अनुभव दिला पाहिजे. त्या मायावी बाजारातच गुरफटल्या आहेत. त्या काय दरबाराचा अंत घेणार?

आपले कार्य अजून पुष्कळ पडलेले आहे. ते कार्य नको का करायला? मग असे करून कसे चालेल? याच्या पेक्षाही महान कार्ये दरबारात येणार आहेत. आता उघड करण्याचे काही कारण नाही. त्या कार्याकरिता या सेवेकऱ्याना कसून घेतलें पाहिजे. जर आता कसून घेतले नाही, तर याच गतीने वाटचाल करून पुढचे कार्य अपुरे राहील. अशा रीतीने सेवेकऱ्यानी कार्ये केली तर, गादीची इभ्रत राहील काय? ©️

You cannot copy content of this page