Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

सर्वभूतेषु एकच तत्व ©️

सर्वभूतेषु एकच तत्व ©️

श्री समर्थ मालिक – भक्त हा भगवंतावर अन् भगवंत हे भक्तावर अवलंबून असतात. भक्ती प्रेम निर्माण झाले की मनाची चंचलता आपोआप दूर होते. जोपर्यंत मनाची शुद्धता नाही, तोपर्यंत भक्ती ही कठीण वाटते. मन शुद्ध झाले की भक्तीत कठीणता नाही. सर्वभूतेषु एकच तत्व आहे, पण अनंत रूपे अनंत नामे याने नटलेली महामाया ही नटविली कोणी? तर त्याच महान तत्वाने नटविली आहे. अनंत रूपामध्ये ही प्रकृती वावरते. जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत! म्हणून प्रकृती ही अनंत स्वरूपाने नटलेली आहे. तशीच मते सुद्धा भिन्न आहेत. पूर्वजन्मीचे सानिध्य आहे, त्यामुळे त्याला जरी सद्गुरु दर्शन नसले, तरी मनाला सत् बनविण्याचा प्रयत्न केला तर ते स्थिर होते. मन हे कोणापासून आहे? प्रकृतीची अंगे वेगवेगळी दाखविलेली आहेत. पण प्रकृतीच्या आतमध्ये एकच तत्व आहे. मग ते एकच तत्व भिन्न प्रकृतीच्या अनुसंधनाने अनुग्रह देण्याचा प्रयत्न करते. ते ही, त्या तऱ्हेची प्रकृती असेल तर उपरती येते. अनुग्रह देणारे वेगळ्या प्रकारचे अन् सद्गुरु वेगळ्या प्रकारचे असे म्हणता येईल का? ©️

You cannot copy content of this page