Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

समर्थ संदेश – गुरुपद ©️

समर्थ संदेश – गुरुपद ©️

श्री गुरु पौर्णिमा समर्थ संदेश – सतपुरुष आणि सेवेकरी यांची यथासांग पूजा शांत वातावरणात व्हायला हवी. पूजा करताना कोणीही घाबरण्याची आवश्यकता नसते. ती करताना शांत विचार ठेवूनच करावी. प्रेम भावनेने केलेली पूजा मान्य करून घेणे असते.

या ठिकाणी व्यास पूजेची किती वर्षे झाली? म्हणून सेवेकऱ्यांचे हे ठिकाण पवित्र अन् सेवेकऱ्यांचे कर्तव्य हे पवित्र हे येथील सेवेकर्‍यांनी समजावयास पाहिजे. कोणत्याही सेवेकऱ्याने आपल्या मनाची भावना गढूळ होऊ देता कामाची नाही.

आजच्या या शुभदिनी कोणालाही नाराज केलेले नाही. सेवेकरी चुकला आणि चुकतो तरी त्याला मर्यादा आहेत. काही सिद्ध ज्योतींकडून कर्तव्य करून घ्यावयाचे असते. ते कर्तव्य रहित होते, रहित केले जाते. आज खरोखर मी भारावून गेलो आहे. ज्याला सत प्रगट करावयाचे असते अन् ज्यांच्या हे आधीन आहे अशा गुरुपदाचा महिमा अत्यंत श्रेष्ठ आहे. हे येथील सेवेकऱ्यांनी आजमावले असेलच. या ठिकाणी गुरुपदाचा महिमा एका क्षणात दाखविला हे सेवेकर्‍यांना दिसून आले. असे हे गुरुपद काय आहे? आपल्या भक्तांचे कोडकौतुक पुरविण्यासाठी एका क्षणात हे घडविले आहे.

गुरुपद हे अखंड त्रिकाला-बाधित आहे. ते कोणीही निर्माण केलेले नाही. कोणीही निर्माण करविता नाही. असे हे स्वयं आणि अखंड पद आहे. याची महती, महिमा अत्यंत श्रेष्ठ आहे. त्यांची वाणी, त्यांचे याला अतिशय महत्त्व आहे. गुरुपद हे ज्ञानमय बीजारोपण करण्यासाठी विखुरले आहे. हे अनाठाई जाणार नाही. आत्ताच याचा अनुभव घेतला आहे. स्वयंपद गुरुपदाच्या मुखातून निघाले, तरी पण ते गुरुपदाला किती लिन आहे? गुरुपदाच्या मुखातून निघालेली अमृततुल्य वाणी झेलने हे प्रत्येक सेवेकऱ्याचे कर्तव्य आहे. ©️

You cannot copy content of this page