Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

समर्थ प्रवचन – ©️

समर्थ प्रवचन – ©️

श्री समर्थ एकचित्त – सृष्टी नियमाप्रमाणे जी घडण घडावयाची असते, ती घडवून घ्यावी लागते. कार्य चालू आहे. कालगतीप्रमाणे थोडे मागे पुढे होते, त्याबद्दल चिंता करण्याचे कारण नाही. जे होते ते चांगल्यासाठीच होते. वाईट झाले, तर वाईटातून सत् प्रेरीत बीज बाहेर पडते. वाईट कृत्य दिसायला दिसते, पण त्यातूनच चांगले पैदास होऊन बाहेर पडते. कोणतीही घडण घडविण्यासाठी काहीतरी निमित्त काढावे लागते.

एवढेच, असत्याच्या नाशासाठी, सताला थोडी झळ लागते. हे सत्य आहे. पण जी घडण घडावयाची, ती काही अंशी घडवून घ्यावी लागते. “बोलविता धनी”, त्याचप्रमाणे कृती करून घेणारा फार वेगळा आहे. जी घडण घडली, ती कुणामुळे घडली? ती सत्य आहे. पण या घडणीमुळे खालपासून वरपर्यंत हादरे बसले आहेत. जाणीव झाली आहे. थोड्या कालावधीनंतर काय चमत्कार होईल हे आत्ताच सांगता येणार नाही.

दरबार हा दरबार आहे ! आसन हे आसन आहे ! ज्या ठिकाणी बसाल त्या ठिकाणी दरबार आहे. त्या ठिकाणी आसन आहे. जशी संघर्षणे होतात, तसे सताकडून आदेश सुटत असतात. जे खेळ खेळावयाचे ते प्रत्यक्ष सत् खेळत नाही, तर जी लाघवी शक्ती, ती खेळ खेळत असते. काहीही स्थित्यंतरे झाली, उलथा-पालथ झाली तरी सत् ते सतच राहणार आहे. ते एकदा प्रकट झाले की, मग कोणालाही आटोपता येणार नाही. एक जरी सताचा किरण प्रगट झाला, तरी तो कुणालाही सहन होणार नाही. आज जरी मायावी कृती दिसली नाही, तरी ती जरूर दिसण्यात येईल. ©️

You cannot copy content of this page