Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

सताचा शोध ©️

सताचा शोध ©️

मालिक – सत् शोधण्यात जरी कालावधी लोटला, तरी हे सत् आहे की नाही, हे अजमावण्यात येते, म्हणूनच अवधी जात असतो.

मानव भक्ती करताहेत. कोणती कां होईना? इथपर्यंत आले नाहीत, तरी त्या तत्वापर्यंत जातील. यामुळे लक्ष देण्यात आले नाही. फक्त त्याचा आढावा केव्हा घेण्यात येतो, ज्यावेळेला प्रत्यक्ष आसन या भागात पडले, त्यामुळे कार्यात लक्ष घालावे लागले.

मानवांची अधोगती कां झाली? तो मायेच्या वेष्टणात गुरफटला गेला. त्याला माहित नाही कार्य सत् आहे कां असत आहे? चोराला वाटते की, मी करतो ते सतच करतो, पण पाहणाऱ्याला ते असत दिसते. त्याच तऱ्हेने त्याकडे लक्ष दिलेले नाही. कार्य दिले. करीत आहे.

क्षिराब्धी सामान्य तत्व आहे कां? त्याच्या निराळे तत्व कोणते आहे याची मानवाला जाणीव नाही. एका राक्षसासाठी त्यांनी किती शक्ति पणाला लावली, त्याची त्यांना गती नव्हती, जाणीव नव्हती.

कार्य करताना मानवाची अशी दशा व्हावी, कारण शुल्लक असते. दुर्बुद्धी केव्हा सुचते? पराकोटीला गती जाते, त्याचवेळेला अशी स्थिती होते. त्यांची गती आज काय झाली आहे? त्यांच्या खालची तत्वें मानवांना शुध्दीवर आणण्यासाठी निर्माण केलीत. परंतु, त्यांनी सताला धाब्यावर बसवून मानवाला अधोगतीला नेण्याची पराकोटी केली. आता प्रत्यक्ष कार्याचा आढावा घेतला, म्हणून हे कळले.

मालिक अणूरेणूत आहेत, परंतु, सेवेकऱ्याला कार्य दिल्यानंतर ते चोख बजावतात असा पूर्णत्वाने विश्वास म्हणून त्याठिकाणी मालकांनी जाण्याची जरूरी आहे. (समाप्त)©️

You cannot copy content of this page