Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

श्री समर्थ मालिक – अघोरांचे खच्चीकरण कसे होते याची कल्पना सेवेकऱ्यांना नाही. त्यांच्या दुष्कृत्यांची भरपाई झाल्यानंतर त्यांची कृती त्यांच्यावरच उलट झाल्यानंतर कार्य …

श्री समर्थ मालिक प्रवचन ©️

श्री समर्थ मालिक प्रवचन ©️

सत् मार्गाने, सत् आचरणाने, सत् भक्ती युक्त अंत:करणाने ते तन काढून टाकावयास पाहिजेत. मनाची शुद्धता झाल्यानंतर सत् मार्ग दिसतो. अशा तऱ्हेने जो जातो, तिच सहज समाधी होय.

असा सर्वांग परिपूर्ण जो होतो, त्याला नेहमी सत् दिसते. पाहता येते. तेच सत्, तेच बीज, त्याचेच बीजारोपण करायचे असते. अशा तऱ्हेने वागल्यानंतर कोणतेही व्याप मागे लागणार नाहीत.

मन द्विधा झाले म्हणजे अनेक उपाधी पाठीमागे लागतात, म्हणून ठाम झाल्यानंतर माझे मालिक समर्थ आहेत, काहीही होवो, सदगुरू चरणांवर अर्पण करणे हे सेवेकऱ्याचे कर्तव्य आहे.

दैविक चमत्कार नाही, उपाधी नाही, कोणत्याही तऱ्हेची व्याधी नाही, फक्त मनाचा कमकुवतपणा असल्याकारणाने व्याधी आहे. असा व्याप होतो. बाबा विचारणा करतात – मालिक आदेश म्हणजे काय? त्याची किंमत काय? एवढे स्पष्टीकरण करून सांगावे अशी इच्छा आहे.

समर्थ म्हणतात – आसनाधिस्त कोण आहेत ह्याची सेवेकऱ्यांनी ओळख करून घेतली आहे का?

आदेश – आपल्या सेवेकऱ्यानी प्रत्यक्ष यावर पाहणी करावी. आसनावरून आदेश सुटल्यानंतर किती ठिकाणी, कोणत्या तऱ्हेने, कोणत्या तत्वाने, तो कुठे कुठे घुमत असतो याची जाणीव घ्यावी.

(तो आदेश) चराचर, परात्पर सर्वत्र घुमतो. आसनावरून आदेश सुटल्यानंतर तो आदेश कोणाला आहे, मग तो समाधीत असो, अगर कोणत्याही उपाधीत असो, याची जाणीव घेऊन, एका क्षणात दरबारात खडे होतात. सेवेकऱ्यांचे जीवन मायावी असले तर आदेशाचे महत्व काय आहे? आदेशाचे महत्व प्रत्यक्ष प्रकाशात सेवेकऱ्यानी घ्यावयास पाहिजे.

आदेश कोठून, कोणाचा आहे? तो तीन ताळ, सप्त पाताळ, एकवीस स्वर्ग घुमत असतो. अशा आदेशाची अवहेलना केल्यानंतर काय स्थिती होते, हे दरबारात पाहतच आहात. आदेश म्हणजे आदेश – त्याची किंमत प्रत्येक सेवेकऱ्याने ठेवलीच पाहिजे. हा नाद एकाचाच नसून, तो ऐकण्यासाठी, झेलण्यासाठी अनेकांची धडपड असते. चरणांची सेवा करणारे फार थोडे आहेत. प्रत्येक युगात सर्वच चरणांवर लीन होणारे असते, तर अवतार कार्य घ्यावे लागले नसते.

ज्याला आदेश पटले, तो सर्वस्व आपल्या सद्गुरु चरणांवर अर्पण करतो, त्यालाच आदेशाची किंमत व ओळख असते. आदेशाची प्रत्येक सेवेकरी वाट पाहत असतात. पुढच्या दरबारात आदेशावर आणखी प्रवचन होईल.(समाप्त) ©️

You cannot copy content of this page