Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

श्रीराम नवमी – १ ©️

श्रीराम नवमी – १ ©️

श्री रामप्रभू – मानवांचा उद्धार करण्यासाठी, सताला तारण्यासाठी व असताचा नाश करण्यासाठी जी अवतार कार्य निर्माण केली गेलीत, त्यांचा हा शुभ दिन आहे. त्याप्रमाणे सर्वस्व अवतार कार्यांची कृती घडण घडविली. परंतु मानवांचे कोड कौतुक पुरविण्यासाठी ही गती प्रत्येक अवतार कार्यात घडवली आहे.

प्रत्येक अवतार कार्यात सताला संरक्षण देणे व असताचा नाश करणे याची घडण अगोदरच घडलेली असते. हे सर्वस्व कशासाठी? केवळ मानवांचा उद्धार करण्यासाठी. एकच, मानवाचे अवतार कार्य आहे. याचा आढावा आधीच घडलेला असतो. फक्त मानव योनी मध्ये सत शोधण्यासाठी मानवाला बुद्धी दिलेली आहे. त्याप्रमाणे वाटचाल करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे.

तो सत कसा बनेल, यासाठीच त्याने प्रयत्न करणे. तो मानव सत शोधण्यासाठी सतमय होतो, त्याला सताची पूर्णत्वाने ओळख पटते. तो देव बनतो. त्याच्या ठिकाणी देवपणा येऊन तो पूर्णत्वाने सतमय होतो. याप्रमाणे तो एकदा पूर्ण सतमय झाला, मग पुढे कोणतीही गती नाही.

मानवाचे ज्याप्रमाणे कृत्य, त्याप्रमाणे त्याच्या संचिताची घडण घडली जाते. आम्हाला सुद्धा अवतार कार्यात कर्तव्य करावे लागले. त्यावेळेला जे काही बरे वाईट झाले तेच पूर्व संचित होय. पूर्ण सत्यमय झालेल्या ज्योती, त्या सुद्धा पूर्व संचितातून सुटल्या नाहीत. असे का? याचा सर्वस्व आढावा अवतार कार्याच्या अगोदर तयार असतो. पुढे सुरु….२ ©️

You cannot copy content of this page