Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

श्रीराम नवमी – ३ ©️

श्रीराम नवमी – ३ ©️

ज्या ठिकाणी सेवेकर्‍याला वाघाचे व गायीचे दृश्य दाखविले, त्या ठिकाणी एक झरा आहे. १८ वनस्पतींचे मूळ त्या ठिकाणी आहे. तो झरा, ती नदी तिला गुप्तता कशी? तिचे पाणी कुठून आले? पण अघोरी राक्षसाने आश्रमाचा नाश केला. त्या ऋषीला परिवारासह गायब केले आणि या गुप्त नदीला पाताळात खेचले. परंतु जे १८ वनस्पतींचे मूळ त्या ठिकाणी पाण्याचे टाके आहे. पुढे या नदीची गुप्तता पूर्णत्वाने उघड करणार आहे. पुढे हे महान क्षेत्र होणार आहे. चौकटांना काढले त्याचवेळी बोल दिला, त्या ठिकाणी आसन पडणार आहे. भूमीला स्वरूप निराळे येणार आहे. जे दोन टप्प्यांचे शुद्धीकरण झाले, तिसऱ्या टप्प्याचे हे कार्य आहे. आपण आत्तापर्यंत नाराज स्थितीत होता. ज्या संदेशांची वाट पाहत होता, त्याचे स्पष्टीकरण स्पष्ट होणार आहे. त्या ठिकाणी महान असे जे ऋषीमुनी त्यांना अजून काढले नाही. त्यांना काढल्यानंतर कलाटणी फार निराळी होणार आहे.

त्या भूमीचा इतिहास फार खोल आहे. हा इतिहास त्या ज्योती कडूनच निवेदन करविण्यात येईल. या भूमीचा उद्धार समीप आला आहे. उ:षापाच्या काळाचे मध्यंतर झाले आहे. उ:षापाचा कमीत कमी १२ वर्षांचा काळ आहे. उ:षाप पूर्ण झाल्यानंतर, या भूमीच्या ठिकाणी नवचैतन्य निर्माण होणार आहे. या भूमीत जे बीजारोपण झाले आहे, हे सर्वस्व कोपिष्ट ऋषींचा शाप आहे.

ज्या ठिकाणी सत, त्या ठिकाणी असत हे आहेच. निर्माण केले आहे. हे कशासाठी? प्रत्यक्ष सत म्हटल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी असत हे असणारच ! मानवाची मानवता जागृत करावयाची आहे. त्यापासून मानवांना परावृत्त करावयाचे आहे. मठाचे कार्य यासाठीच आहे. त्या ठिकाणी अशुद्ध मानव आहेत. त्यांची अशुद्ध गती त्यांना दाखवायची आहे. हे कार्य करावयाचे आहे. जे करायचे ते केले जाणार आहे. अशुद्ध मानवांना शुद्ध केले जाणार आहे. ते कसे? आपण त्या ठिकाणी प्रवचन करून कार्य होणार आहे. मी करून घेणार आहे. जो शुद्ध आहे, तो कर्म संचिताप्रमाणे शुद्ध झाला तो तरला, जो बरबटला त्याला कोणाचा इलाज नाही. आपण परावृत्त करण्याचा प्रयत्न केला तरी ते घडणारच ! माझ्या वेळी सर्वस्व सत असताना एक ज्योत निर्माण झालीच ना? त्यामुळे कोणती स्थिती निर्माण झाली? (समाप्त)

You cannot copy content of this page