Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

श्री समर्थ मालिक – अघोरांचे खच्चीकरण कसे होते याची कल्पना सेवेकऱ्यांना नाही. त्यांच्या दुष्कृत्यांची भरपाई झाल्यानंतर त्यांची कृती त्यांच्यावरच उलट झाल्यानंतर कार्य …

श्रीराम नवमी संदेश ©️

श्रीराम नवमी संदेश ©️

आजचा आनंदाचा दिवस अन् आनंदी वातावरणात सर्वस्व सेवेकरी, ऋषीमुनी, आनंदात आहेत. १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. १४ वर्षात आजचा हा शेवटचा दिवस म्हटला तरी चालेल. म्हणून आजच्या या शुभदिनी सर्वस्वांना मोकळीकता दिलेली आहे. अजून दर्शन चालू आहे. दुसरी गोष्ट, भारताचा आनंदाचा दिवस थोडक्याच दिवसात चमकणार आहे. भारतातील लोक विचित्र, त्याच्या दुप्पटीने महाराष्ट्रातील आहेत. पण महाराष्ट्रात कर्तव्य झाले म्हणून आपणाला त्याबद्दल आपुलकी आहे. हेच पूर्वीचे दंडकारण्य आहे.

संदेश – शेवटचे शुद्धीकरण संपलेले आहे. आता शुद्धीकरण राहिले आहे ते कोणाचे आणि कोणाचे नाही. आता जडत्वाचे शुद्धीकरण आहे. अनेक तऱ्हेने हे शुद्धीकरण घेतले जाईल. एकच तऱ्हेत घुसळण होईल असे नाही. अनेक तऱ्हेने घुसळण होईल. तदनंतर उ:षापाचा काळ. उ:षापाचा दिवस आल्यानंतर याचे सर्वस्व छेदन करून कशा करिता काय झाले याचे निवेदन त्याच वेळेला होईल. हे जडत्वाचे शुद्धीकरण झाल्यानंतर होईल. हे शुद्धीकरण झाल्याशिवाय नाही.

सुख समाधान केव्हा अन् कधी? अघोरांचा नाश झाल्याशिवाय नाही. फार मोठा काळ नाही. थोडासाच अवधी आहे. १९७७-७८ तद्नंतर महाराष्ट्र भूमी कशी होते ते बघा. तोपर्यंत थोडी का होईना मानवाना अशांती निर्माण होणारच ! पूर्णत्वाने शांती लाभण्यास अजून अवधी आहे. ज्यांनी ज्यांनी हे थैमान घातले आहे, ते थैमान एकाएकी नाश पावणार नाही. नाश करता येणार नाही. त्यांच्याच कर्तव्याच्या अनुसंधनाने त्यांचा नाश केला जाईल. आणखीन जे कर्तव्य होईल ते वेगळ्या तऱ्हेचे होईल. ते सांगण्याची आवश्यकता नाही. एवढेही करून शेवटला मागे मी निवेदन केले आहे. भारतासाठी काही टपलेले आहेत, तेव्हा महायुद्ध होण्याचाही संभव आहे. इतके असूनही ही भारतभूमी शुद्ध ठेवली जाणार आहे. ती वेळ येईल अन् ते करावे लागेल. कारण अघोरांना अधून मधून लहर येत असते पण या भारतातील लोक जरी कमजोर व नेभळट असले तरी भारतात वावरणारे तत्व नेभळट नाही. कमजोर नाही. मला जे करून घ्यावयाचे आहे, ते मी करून घेणारच ! (समाप्त) ©️

You cannot copy content of this page