Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

प्रारब्ध घडण….. श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज ©️

प्रारब्ध घडण….. श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज ©️

बाबाप्रारब्ध घडते ते मानवाच्या कृतीमुळे घडते. म्हणून आपल्या कृतीची फळे आपल्याला भोगायला लागतात. येणे नाम प्रारब्ध / संचित. म्हणून विचार सत पाहिजेत. सत् शुध्द गतीने गेले पाहिजे. कर्तव्य सत झाले तर इहात आणि परात पण शांती मिळेल.

संचित घडविणे तुमच्या अधीन आहे. मागे झाले ते झाले. पण आता सानिध्यात आल्यानंतर चांगली फळे निर्माण झाली पाहिजेत. मागे जे घडवले ते कार्य तुम्ही तुमच्या स्वयं गतीने नाश करू शकता. सत गतीने नामस्मरणाने सर्वस्व होते. तुमच्या सत कृतीने तुमचे असत संचित नाहीसे होते. समर्थांबरोबर आतबाहेर केले की आटोपला कारभार. जी सतमय झालेली ज्योत असते ती म्हणते, “जरी चुकले नसले तरी मालिक चुकले माझे.” मग मालिक पण त्याची नोंद करीत नाहीत.

अविनाशी तत्व तुमच्यात वास करीत आहे. आतून बाहेरून सतमय झाल्यानंतर मग काही नाही. पण मन स्थिर होत नाही. मन अखंड नाममय असेल तर त्याला कोणीही हेलकावणार नाही. नाममय असेल तर त्याला लाघवी चकवणार नाही. मन नाममय असेल तर त्याला सताचा ध्वनी सतत मिळतो. ©️

You cannot copy content of this page