Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

निश्चयाचे ऐसे बळ | ©️

निश्चयाचे ऐसे बळ | ©️

निश्चयाचे ऐसे बळ | तुका म्हणे तेची फळ || सेवेकर्‍याला अथवा मानवाला एखादी गोष्ट साध्य करावयाची असल्यास ती वस्तू साध्य करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. असाध्य वस्तू जरी असली तरी तो प्रयत्न सोडीत नाही. प्रथम त्याला सरळ मार्ग सापडतो, त्याप्रमाणे तो वाटचाल करतो. मग त्याला अवघड मार्ग लागतो, महान पर्वत, काटे कुटे, जंगल झाडी, अशा मार्गातून प्रवेश करी निघाला तरी त्याला त्याचे दुःख वाटत नाही. कारण त्याला महान वस्तू प्राप्त करून घ्यावयाची असते. काही झाले तरी तो आपला मार्ग विसरत नाही. तदनंतर त्याला ती वस्तू प्राप्त झाल्यानंतर, समाधान वाटते. मग म्हणतो मी प्राप्त करून घेतली की नाही? अशी त्याला ग ची पीडा होते. अहंकार निर्माण होतो.

त्याप्रमाणे सत् भक्तीसाठी आपण त्या भक्तीच्या अनुसंधनाने मिळालेला सत् भक्तीचा प्रकाश, ती योगीयाची खूण योगीच जाणतो. सत् भक्तीच्या मार्गाने जाऊ लागला, त्याला त्याचा अनुभव येऊ लागला, अनुभव घेऊन तृप्त झाला, मग तो त्या मार्गाने जाण्याचा स्वीकार करतो. पुढे पुढे गेल्यानंतर अडीअडचणी निर्माण होतात. त्रास होतो. त्रास वाटू लागल्यानंतर अनुभव जरी असला तरी त्याचा विसर पडून मग सोडतो का तो?

पूर्वजन्मीच्या संचिताप्रमाणे जी ज्योत प्रथम सत् भक्तीने जाण्याचा किंवा मार्ग आक्रमण करण्याचा अनुभव घेते, त्याला पुढे त्रास जरी झाला तरी पूर्वीच्या अनुभवामुळे सत् भक्तीच्या प्रकाशाला ती विसरत नाही. कारण जे पाहिले नाही ते त्याला पहावयास मिळते.

सत् भक्तीच्या प्रकाशात तो डुंबत असतो. त्याचा निश्चय ठाम असतो. त्याच्या निश्चयाच्या बळाचे वर्णन इतर मानवांना करता येणार नाही. इतर मानवांना त्याची भक्ती आजमावता येणार नाही. (पुढे सुरु…२)©️

You cannot copy content of this page