Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

धन…..(५) ©️

हे धन कधीही उच्च पातळीला भिडविणारे नाही. म्हणून धनलोभी होऊ नका. धन पाहिजे, पण फक्त व्यवहारासाठी. धनासाठी सेवेकरी लांड्यालबाड्या करतात, पण ते योग्य नव्हे.

धनाचा योग्य तऱ्हेने वापर केल्यास, समर्थ कमी पडू देणार नाहीत. समर्थ सांगतात, ते दूरवर विचार करून सांगतात. अशा तऱ्हेने जो वागेल, त्याला समर्थ काहीही कमी पडू देणार नाहीत.

जडाला, स्थुलाला किंमत आहे. नसती तर बुद्धीचे तेज प्रगट झाले असते कां? तेव्हा हीन गतीने जाता कामा नये, जाण्याचा प्रयत्न करू नये. तुम्हाला काही कमी पडणार नाही. पण त्या तऱ्हेने वागा.

सेवेकरी समर्थांना बनवायला लागला तर तो स्वत: बनला जातो. या अथांग महासागराची एक बिंदू बरोबरी करू शकतो कां? अशी स्थिती असताना, समर्थांना शेंडी लावायला जाल तर कसे होणार?

भक्तिमध्ये निर्लज्ज झाल्याशिवाय सद्गुरूंचा अंत सापडणार नाही. तेव्हा त्या ठिकाणी कसली लाज? बिंदू जर सागराची बरोबरी करू लागला, तर तो टिकाव धरील कां? असे अनंत बिंदू त्यांनी फेकले आहेत. त्या अनंत बिंदूतला आपण एक कण आहोत. तो कण त्यांच्या चरणांजवळ जावा ही इच्छा आहे. पण मनुष्याचे जीवनच विचित्र झाले आहे. म्हणून सेवेकऱ्याने लाघवी त-र्हेने धनलोभी होऊ नये. (समाप्त)©️

You cannot copy content of this page