लिनता, नम्रता आणि शांती या त्रिवेणी संगमात सेवेकरी आंघोळ करील तर तो सेवेकरी चुकणार नाही. या त्रिवेणी संगमातील आंघोळीचा अभाव म्हणून सेवेकरी चुकतो.
सेवेकऱ्यांना माहीत असताना, आदेश दिले असताना, जर चूक केली, तर जाणून बुजून चुक केली असे होईल. समर्थांच्या कर्तव्याकडे मात्र सेवेकऱ्यांना लक्ष ठेवता येते, पण आदेशाप्रमाणे, संदेशाप्रमाणे कर्तव्य करता येत नाही. कर्तव्य होत नाही. मग अशा सेवेकऱ्यांना काय करावे? म्हणून जो सत् भक्तीला लागला, सत् कर्तव्याला लागला अशा सेवेकऱ्याने सर्वस्व लक्ष आपल्या सत् कार्यावर ठेवून सत् भक्तीत रममाण होऊन, आपले लक्ष इकडे तिकडे न टाकता, आपले पाऊल इकडे तिकडे ढकलता कामा नये. संदेश डावलता कामा नये. आदेशाची हेळसांड करता कामा नये. कर्तव्याची टंगळ मंगळ करता कामा नये. संदेशाचे, आदेशाचे महत्त्व सांगितले आहे त्याप्रमाणे वागणे. ते आचरणात आणणे, हे प्रत्येक सेवेकऱ्याचे कर्तव्य आहे. (समाप्त) ©️
