Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

चेतना – (ऋषीकन्या) मनोगत ©️

चेतना – (ऋषीकन्या) मनोगत ©️

चेतना – (ऋषीकन्या) प्रथम मला अभय पाहिजे. एवढे सानिध्य असताना मला माझ्या सद्गुरूंची ओळख झाली नाही, याबद्दल वाईट वाटते. सत् कार्याचा नेहमी उपदेश मिळत असताना, हे दुष्कृत्य माझ्या हातून झाले, फार वाईट वाटते. आत्तापर्यंत माझ्या हातून जे काही झाले, ते सर्व सतच झाले असे मला वाटत होते. ती हरीणी गर्भिणी असल्यामुळे, तिच्यावर माझा फार जीव होता. तिला काही जरी झाले तरी माझा जीव खालीवर होत असे. या गर्भिणी हरीणीवर ज्याने बाण सोडला, त्याने २५ वेळा जरी जन्म घेतला, तरी तो यातून सुटणार नाही. त्याचे जीवन कष्टमय स्थितीत जाईल, अशा तऱ्हेने मी त्याला शाप दिला. जशी त्याची गती, तशी माझी पण आहे.

या दिलेल्या शापामुळे माझे थोडे थोडके नुकसान झाले नाही. शाप दिला. नंतर ज्याला शाप दिला, त्याचे पूर्णत्वाने भोग भोगायला लागतात. ज्याने शाप दिला, ते तुम्हीही (शाप देणारे) यातून सुटत नाही.

रागाच्या भरात बोल गेले, पण शांत झाल्यावर सर्व समजले. शाप देणे महान घोर कृत्य आहे. त्याची मला आत्ता जाणीव झाली. ज्या वेळेला अवतार कार्य घेतले, त्या वेळेपासून मी दूर फेकले गेले होते, पण माझ्या सद्गुरू कृपेने जवळ आले आहे. गुरु कृपेने २५ वेळा जन्म घेऊनही गुरुचरण मिळाले नाहीत. त्याला कारण शापदग्ध स्थिती आहे. त्याची गती आज मिळाली. आजपर्यंत वाटत होते की मी सतच करते, पण हे करीत असताना दृष्कृत्य झाले. त्याचा केवढा परिणाम होतो. सद्गुरु चरण साक्ष ठेवून मी दिलेला शाप परत घेतला आहे. फार मोठा चमत्कार झाला. “बाबा! माझी गर्भिणी हरीणी पण मला जिवंत दिसत आहे. मी पूर्णत्वाने शाप मागे घेतला आहे. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page