Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

कोपिष्टाचा कोप ©️

कोपिष्टाचा कोप ©️

सत् तत्व – महाराष्ट्र ही भूमी महान पवित्र भूमी होती. सर्वस्व ऋषीमुनी आपले साध्य साधण्यासाठी या ठिकाणी येत असत. कोपिष्ट मुनि या ठिकाणचे नसून ते दक्षिणेकडचे होते. सिद्धी साधण्यासाठी दक्षिणेकडून ते या ठिकाणी आले. महान तपश्चर्या केली. वरदान मागून घेतले. वरदान मिळाल्यानंतर आपल्या शक्तीचा त्यांच्या ठिकाणी अहंभाव निर्माण झाला. या शक्तीच्या जोरावर त्यांनी कलह घडवून या भूमीला शापदग्ध केले आहे. त्यांचा काळ समिप आला आहे. त्यांनी महाराष्ट्राला दिलेला शाप व उ:षाप पूर्णत्व झाल्याशिवाय त्यांच्याकडे पाहता येणार नाही. सर्वांना त्याविषयी भ्रांती होती.

कोपिष्ट आणि अक्षय अशी जोडगोळी होती. अक्षय ही ज्योत कशी घ्यावयाची याची सर्वस्व ऋषी मुनींना काळजी पडली होती. वशिष्ठांना व चौकटांना याची पूर्णत्वाने जाणीव आहे. त्यावेळी चौकट हेच अधिकारी होते. वशिष्ठ व विश्वामित्र त्याचप्रमाणे चौकट व कोपिष्ट अशी ही जोडी होती. अशा स्थितीत त्यांनी आपले कार्य सिद्ध करायचे योजले होते. चौकट ऋषीने अशा कचाट्यात त्यांना पकडले होते की त्यामुळे कोपिष्टाचा कोप लयाला गेला. त्या भरात त्याने विचार न करता महाराष्ट्र भूमीला शाप दिला की तुमची सिद्धता मी सिद्ध होऊ देणार नाही.

मग कोपिष्ट अक्षय याच्या आश्रयाला गेला. अशा तऱ्हेने आपले उद्दिष्ट पूर्णत्वाने साधण्यासाठी त्याने अक्षयाचा आश्रय घेतला. अशा तऱ्हेने ही स्थिती निर्माण झाली. शुद्धीकरण पूर्णत्व झाल्यानंतर महाराष्ट्राचा उज्वल काळ आहे. ऋषीमुनी डोळ्यात तेल घालून या काळाची वाट पाहत होते. हे पवित्र स्थान आहे. ही सुवर्ण भूमी आहे. महान अधिकाराचे ऋषीमुनी या ठिकाणी होते. या ठिकाणी ज्ञानार्जनाचे कार्य अव्याहत चालत असे. लांब लांबचे ऋषीमुनी ज्ञानार्जनासाठी येथे येत असत. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page