वालावल कूपीचा डोंगर – वालावल या ठिकाणी कूपीच्या डोंगरावर अक्षय नावाची महान अघोरी ज्योत होती. त्याचे प्राबल्य त्या ठिकाणच्या सबंध परिसरात होते. त्याचे सर्वस्व गण प्रत्येक गावी दैवत या रूपाने वावरत होते. अत्यंत रमणीय, आल्हाददायक असे हे क्षेत्र आहे. याच ठिकाणी असणारी एक गुप्त नदी, अक्षय याने आपल्या शक्तीने बंधन घालून पूर्णत्वाने आपल्या ताब्यात घेतली. तिची सर्वस्व शक्ती नष्ट केली. पुरातन काळी महान असे हे क्षेत्र होते. बाजूला वाहणारी प्रचंड नदी हे सुद्धा एक महान असे क्षेत्र होते. त्या ठिकाणी पुरातन काळी महान महान ऋषी मुनींचे आश्रम होते.
आपले सध्या ज्या ठिकाणी आसन पडले आहे, तो पूर्वी मठ होता. त्या ठिकाणी निरनिराळ्या ठिकाणाहून ऋषीमुनी येत असत. ही भूमी अत्यंत पवित्र, रमणीय, त्याचप्रमाणे सुवर्णभूमी होती. सर्वस्व शांती, सुबत्ता या ठिकाणी नांदत असून कशाचीही वाण नव्हती. प्रत्यक्षात सत तत्वाचा या ठिकाणी वास असून, प्रत्यक्ष सत् तत्व या ठिकाणी वावरत होते.
परंतु त्या ठिकाणी अशा तऱ्हेने शांती सुबत्ता असताना अहम् भाव निर्माण झाला. त्यामुळे कोपीष्ट ऋषीने या भूमीला शाप दिला. दुसऱ्या ऋषी मुनींच्या सांगण्यावरून त्याने उ:षाप दिला. हा अक्षय त्यावेळी, या ठिकाणच्या पलीकडील परिसरात महान सम्राट होता. सर्वत्र ऋद्धी सिद्धी, मंत्र तंत्र, वरदहस्त यामुळे तो महान बलाढ्य असा राजा त्या ठिकाणी नांदत होता. कोपीष्ट मुनी पूर्णत्वाने अहंपणाच्या गर्तेत गेला व त्याने ऋषीमुनीं बरोबर कलह करून तो या अक्षयाच्या आश्रयाला गेला. त्याने इकडील सर्वस्व ऋषी मुनींचे स्पष्टीकरण त्याला सांगितले. त्याप्रमाणे त्याने केले. स्थूलातून बाहेर पडल्यानंतर तो सर्वस्व परिसर त्याने आपल्या ताब्यात घेतला आणि प्रत्यक्ष मालकांना प्रसन्न करून अभय, वरदहस्त, संजीवनी सर्वस्व याने मागून घेतले. परंतु प्रत्यक्ष अवतार कार्याला सुरुवात झाल्यानंतर त्याच्या शक्तीचा क्षय होईल ही एकच मेख मारण्यात आली होती. अक्षय याला जो वर मिळाला त्याच्या जोरावर त्याने सबंध महाराष्ट्राला जर्जर करून सोडले. अशा तऱ्हेने अक्षयाचे प्राबल्य आणि कोपिष्ट मुनीचा शाप, यामुळे ही सबंध भूमी जर्जर झाली. हे शुद्धीकरण पूर्ण झाल्यानंतर ही भूमी पूर्णत्वाने मुक्त होणार आहे. ©️
