Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

कूपीचा डोंगर – भाग २ ©️

कूपीचा डोंगर – भाग २ ©️

आपले जे स्थान आपले जे स्थान कूपी आहे, त्या ठिकाणची गुप्त नदी जी अक्षयाने आपल्या ताब्यात घेतली होती, संदेश आहेत आपणाला, हे सर्वस्व मोकळे करावयाचे आहे. त्याचे सर्वस्व मार्ग, निवेदन करणार आहे. चौकटांच्या वेळीच हे कार्य करावयाचे होते, पण कार्य पूर्ण झाले नव्हते. हे महान असे क्षेत्र आहे. या क्षेत्राला आता फार मोठे महत्त्व मिळणार आहे. जो पिंपळाचा पार या ठिकाणी होता, तेथे या काळी ऋषी मुनींचा फार मोठा आश्रम होता. या आश्रमात ज्ञानार्जनाचे कार्य अव्याहत चालत असे, पण अक्षयाने आपल्या शक्तीच्या जोरावर सर्वस्वाचा लय करून, सर्वस्व आश्रम पूर्णत्वाने गायब केला.

आणखी एक मोठे कार्य करावयाचे आहे. या ठिकाणी १८ वनस्पतींचे एकीकरण झाले आहे. १८ वनस्पतींचे मूळ, त्या ठिकाणी पाण्याचे टाक आहे. त्याचे सर्वस्व बंधन उडवून ते मोकळे करावयाचे आहे. निसर्ग रोगाच्या परिहारासाठी या पाण्याचा उपयोग करावयाचा आहे. वापर करावयाचा आहे. या डोंगराची सर्वस्व गुप्तता पुढे निवेदन करण्यात येईल. ज्या वेळेला प्रसार कार्याला सुरुवात होईल, त्यावेळेला पूर्णत्वाने स्पष्टीकरण मिळेल. या डोंगरात गुप्त जे काही आहे, ते पहावयाचे आहे. पण ते आत्ता नाही. त्याचे संदेश पुढे देण्यात येतील.

कृष्ण अवताराच्या उत्तरार्धात ज्या वेळेला भारतीय युद्ध झाले आणि ज्या वेळेला उत्तरेच्या बाजूला सर्वस्व आनंदमय वातावरण निर्माण झाले, त्या वेळेला ही ज्योत निसटून या ठिकाणी आली. मग या ठिकाणी त्याने आपले सर्वस्व प्राबल्य दाखवून व जम बसवून सम्राट म्हणून वावरू लागली. कोपिष्टाचा आश्रय घेऊन अखंड महाराष्ट्र भूमीवर याने आपला पगडा पूर्णत्वाने बसविला. तीन ते चार हजार वर्षांच्या पाठीमागचा हा काळ आहे. या कर्तव्यामुळे आपण कार्याचा महान टप्पा गाठला आहे. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page