Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

कलियुग सरत आहे…©️

कलियुग सरत आहे…©️

कलियुगाचा मध्य उलटला आहे. स्फोट होणारच आणि त्याप्रमाणे दिसण्यात येईल. गती घेण्याचा काळ अगदी समीप आला आहे. ज्या वेळेला कर्तव्य परायणता होईल, त्यावेळेला पूर्णत्वाने संदेश मिळतील. दिले जातील. चिंता करावयाची नाही. सत्य म्हटले तर, हे कलियुग आहे. सत आहे हे. ते सत् तरी कशावरून? स्थिती गती नुसार ह्याची कल्पना येतेच आहे.

कोकणात स्थापित झालेले आसन हे चमत्काराने नटलेले आसन आहे. हे सत्य समजा. दंडकारण्यात सर्वत्र अघोरी तत्वे विखुरली होती. एक, दोन, तीन शुद्धीकरणे घेतली तरी ती भूमी अजून शुद्ध झालेली नाही. अशीच पुढे शुद्धीकरणे होत होत ती पूर्णत्वाने शुद्ध होईल. ती शुद्ध आणि पवित्रच आहे. चमत्कार त्या ठिकाणी होतील. परंतु थोडासा अवधी आहे. आपण मला टोचत होतात की अखंड चमत्कार हे कोणते चमत्कार? अखंड चमत्कार हे अखंडच असतील. त्यांना कधीही खंडत्व नाही.

सताला नेहमीच त्रास होतो. त्यावेळेला नाराजी होते. कर्तव्य करताना जो आनंद मिळतो, तो फार निराळा असतो. कर्तव्य केल्यानंतर जी ठेवण मिळते ती अखंड असते. सातारला पण मानवी गतीप्रमाणे त्रास झाला, पण आसन त्याच ठिकाणी आहे. मानव जरी सत् तत्त्वाचा अंश असला तरी कालचक्रात जर सापडला तर तो सतापासून वेगळा राहतो, मग पळून जातो कोण? त्रास होतो हे मला मान्य आहे. त्या ठिकाणी मानवी गतीप्रमाणे भक्तीयुक्त वातावरण निर्माण झाले पण केव्हा? सत् हे अखंड पाठीशी आहेत हे समजल्यानंतरच ना? पण त्रास देणाऱ्याची कोणती गती झाली? पळून गेला कोण? आता त्या ठिकाणी मानाने, डौलाने त्या आसनाजवळ मिरवता आहेत कोण? जरी चमत्कार मागितले नाहीत, तरी पण कोकणातील माणसे ही दैविक आहेत, भाविक आहेत. राजमार्ग त्यांना सापडला आहे, तो ते मार्गक्रमण करीत करीत सताप्रत येण्याचा प्रयत्न करतील आणि येतील. ©️

You cannot copy content of this page