Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

आसनाचे अधिकार ©️

आसनाचे अधिकार ©️

आसनाला स्वयमेव अधिकार आहेत. वेळ येईल त्याप्रमाणे वापरण्यात येतील. स्थूल अधिकार हे स्वयमेव अधिकार आहेत. प्रश्न एवढाच, केव्हा आणि कुठे वापरावयाचे? तो अमोलिक ठेवा दिलेला आहे.

हे आसन उत्तरेला होते. त्यावेळेला महाभारत घडले. या वेळेला हे आसन महाराष्ट्रात आहे. त्याच्या मुक्ततेचा काळ फार जवळ आलेला आहे. असे संघर्षण होऊन, महान चमत्कार घडणार आहेत. महाराष्ट्राचे सर्वस्व कार्य करण्यासाठी रामाने वनवास पत्करला.

अयोध्या कुठे आणि दंडकारण्य कुठे? जे कार्य करावयाचे ते सर्वस्व घडवून घ्यावे लागते. आणखी स्थित्यंतरे घडणार आहेत. त्याप्रमाणे कार्ये होतील.

असताचा पगडा वरचढ झाला तर आसन गप्प बसणार नाही. काहीही संदेश न घेता कोपिष्टाने दिलेला शाप आपण मान्य कसा केला? पण रथी, महारथी कार्य करीत असतात. पुढे महान कार्य आहे. महाराष्ट्राच्या शापाच्या उ:षापाचा काळ आहे. सर्वस्व गती स्थिर झाल्यानंतर कोपिष्टांना या ठिकाणी घ्यावयाचे आहे. ते ज्या वेळेला सत जबानी देतील त्या वेळेला कार्य होईल. कोपिष्ट आत्ता फारच गतिमान आहे. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page