Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

अढळ श्रध्देचे फळ …..मालिक ©️

अढळ श्रध्देचे फळ …..मालिक ©️

पूर्वी भक्तीला जरी त्रास होत असला तरी त्याला प्रतिसाद मिळण्याला बरीच मदत होत होती. हल्ली भक्ती करणारे फारच तुरळक आहेत. जरी असले तरी त्यांची निंदा नालस्ती होते आणि परिस्थिती ही प्रतिकूल आहे. पूर्वीपेक्षा हल्ली भक्ती साधी आणि सोपी आहे. तसे पूर्वी नव्हते. पूर्वी फार कसून घेतले जात असे. हल्ली तसे कसून घेतले जात नाही.

पूर्वी एखादे कार्य करीत असताना मदत केली जात असे. तशी आताची परिस्थिती नाही. ज्याला भक्तीची चव समजली त्याला अडचणी फार निर्माण होतात. तरी सुद्धा आपले पाऊल वेडे वाकडे न पडण्याची तो दक्षता घेतो. जे विरोधक असतात त्यांची तो तमा पाळत नाही.

आपणाला सांगितल्याप्रमाणे तो सेवेकरी वाटचाल करतो. त्यातूनही एखादा सेवेकरी आत बाहेर करत असेल, तर त्याला अडीअडचणी निर्माण होतात. कारण त्याची अढळ श्रद्धा नसते. श्रद्धा जर अढळ असेल तर तो वाटेल त्या अडीअडचणीतून निभावून जातो. हे सेवेकऱ्याच्या अढळ श्रद्धेचे फळ आहे.

सद्गुरु कोणाचेही ऋणी नाहीत. पूर्वजन्मीचे जे देणे, ते देऊन टाकतात. त्याचा उजाळा करणे हे प्रत्येक सेवेकऱ्याचे कर्तव्य आहे. ते त्याच्यात भर टाकतील तर सुखी होतील.

प्रत्येक सेवेकर्‍यांनी जरी अडी अडचणी आल्या, कोणी काहीही बोलले तरी आपली चाकोरी सोडावयाची नाही. आसनाधिस्तानी जे सांगितले, बोधामृत पाजले, त्याची सतत आठवण ठेवून त्याप्रमाणे वागणे. तो येथे सेवेकरी तर बाहेर सद्गुरू पदाने वावरला जातो. कारण येथील प्रत्येक बोल अनुभविक आहे. येथे प्रत्यक्ष अनुभव दिला जातो, नंतर सांगितले जाते. (पुढे सुरु…….२)©️

You cannot copy content of this page