Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

अखंड तत्व – २ – ©️

अखंड तत्व – २ – ©️

पण इतकेच आहे की, अघोराचा कोणत्या तऱ्हेने नाश करणे हे मी जाणतो. हे माझे कर्तव्य आहे आणि मी ते सोडणार नाही. हे कर्तव्य मी करून घेतो. मी कोठेही जात नाही. मी अंत दिलेला नाही आणि कोणी लावलेला नाही, लावू शकले नाहीत. मी एकाच ठिकाणी आहे असे मला कोणी पकडू शकेल का? सेवेकऱ्यांनी माझा थांगपत्ता लावलेला आहे का? आणि लागेलही, पण कोणाला? सेवेकरी त्या पात्रतेचा असेल त्याला. सेवेकऱ्याला खूण जरी माहीत असली आणि त्याचे मन इकडे तिकडे आत बाहेर करू लागले तर त्याला माझा थांगपत्ता कदापिही सापडणार नाही आणि अशी जी कर्तव्ये आहेत, ती कर्तव्ये मी करतो आहे, असे कोणी म्हणेल का? आणि म्हटलेले आहे का? आदिअंता पासूनचा पुरावा आहे का? जे अखंड तत्व आहे, तेच हे सर्वस्व करते असे कोणी म्हटले आहे का? क्षिराब्धीने अवतार कार्ये नटवलीत, त्यावेळी कर्तव्ये कोणी केली? रामावतारात रामाने कर्तव्य केले, कृष्णावतारात कृष्णाने कर्तव्य केले, असे म्हणतात ना? अशी अवतार कार्ये क्षणोक्षणी नटवली होती. जडत्वाला पुढे घालून ती कर्तव्ये झाली आहेत. म्हणून मी करून अकर्ता आहे. मी काही करत नाही. (पुढे सुरु….३)

You cannot copy content of this page