श्री समर्थ मालिक - श्रीकृष्ण जयंती - या ठिकाणी ज्ञानच भरलेले आहे, परंतु घेणारा पाहिजे. ज्ञान साधे, सोपे, सुलभ तितकेच ते कठीणही आहे. कठीण कोणाला अन् सुलभ कोणाला? करील त्याला सोपे आहे, न करील त्याला कठीण आहे.
मी ज्यावेळी प्रत्यक्षात अवतार कार्य नटविले, ते कोणत्या कारणाने घेतले? त्यावेळी सेवेकरी, मानव प्राण्यांना भयंकर त्रास होता,…
श्री समर्थ मालिक – सेवेकरी दरबारात व दरबाराच्या बाहेर कसा वागतो? तर दरबारात घाबरतो व बाहेर घाबरत नाही. सेवेकरी येथे धीट व बाहेरही धीट पाहिजे. तो म्हणतो, बाहेर तरी कोण बोलणार आहे?
येथे दरबारात खूप प्रवचने होतात. येथे सत् सानिध्य आहे. येथे मी आहे व बाहेर पण मी आहे. परंतु जो सेवेकरी ठाम आहे,…
मालिक – स्वधर्म हे निधान आहे. धर्म म्हणजे कोणता धर्म? धर्माच्या व्याख्या दोन आहेत – धर्म म्हणजे मानव धर्म !
(१) भिक्षुकाला धर्म म्हणजेच दान देणार, तोही धर्म आणि (२) सत् कृतीने मानवात जाणे तो ही धर्म !
पांडवांमध्ये धर्म होता, तो ही धर्म !…
मग, स्वधर्म श्रेष्ठ कां परधर्म? जो सत् प्रविण आहे, सत् पुत्र आहे, सतभक्त आहे, त्याला कसलीही उणीव पडणार नाही. उणीव भासू देणार नाही. ज्ञानेश्वरांनी विचारणा केलेली आहे, राजाची कांता दारोदारी भिक मागत फिरेल कां? तिच्या मनाजोगती सिध्दी पावेल कि नाही? का तो भिक्षांदेही असतो? पण कल्पतरु तळवटी बसल्यानंतर त्याची भावना कुठेकुठे जाते?
पण कल्पतरु…
स्वधर्म म्हणजे काय? अन् परधर्म म्हणजे काय? स्वधर्म म्हणजे तो सतपूर्ण आहे, ज्याच्या मुखावर सताची झलक असते, ज्याची सतकृती आहे, सतभक्तीत रममाण आहे, तोच खरा तो धर्म होय. असा भक्त भिक्षांदेही नसतो. त्याची इच्छा पूर्ण होते. तो स्वयं तत्त्वावर अवलंबून असतो. जो सतमार्गाने, सतधर्माने जातो, त्याला दुसरीकडे भिक्षा मागण्याची जरुरी नसते.
पर म्हणजे अंधार,…
मानव म्हणतात हा वेडा आहे. त्याच्या संगतीत राहून उपयोग नाही, पण त्याचे जे बळ असते त्याची खूण गांठ त्याने बांधलेली असते. त्याने निश्चयाचे बळाची शक्ती वाढविलेली असते. ती कोणालाही तोडता येणार नाही. नंतर अडी अडचणीतून त्याचा कस घेतला जातो. त्या कसातून उतरल्यानंतर त्याचे फळ त्याला मिळते. मग समर्थ त्याला अनवाणी पाठविणार नाहीत. त्याच्यावर पूर्ण लक्ष…
निश्चयाचे ऐसे बळ | तुका म्हणे तेची फळ || सेवेकर्याला अथवा मानवाला एखादी गोष्ट साध्य करावयाची असल्यास ती वस्तू साध्य करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. असाध्य वस्तू जरी असली तरी तो प्रयत्न सोडीत नाही. प्रथम त्याला सरळ मार्ग सापडतो, त्याप्रमाणे तो वाटचाल करतो. मग त्याला अवघड मार्ग लागतो, महान पर्वत, काटे कुटे, जंगल झाडी, अशा…
नामाची मूळ उत्पत्ती कशी झाली? मूळ ओंकारापासून ध्वनी निर्माण झाला. त्यातच नाम प्रगट झाले. त्यापासूनच मनुष्य निर्माण झाला. मनुष्याला तारण्यासाठी भक्ती निर्माण झाली. सद्गुरु तारक या पदापासून सर्वस्वाचा उद्धार!
सद्गुरु कसे आहेत? कोणत्या तऱ्हेचे आहेत? त्याची ते ओळख देतात. सद्गुरु नाम देवून आकारी प्रसवले आहेत. आसन कोणत्या तऱ्हेचे आहे? स्थूल, सूक्ष्म कोणत्या तऱ्हेचे आहे,…
साक्षात मालकांचे बोल - मानव धर्म श्रेष्ठ ! मानव धर्माचा उद्धार करणे श्रेष्ठ ! या दोहोंमध्ये मनुष्य श्रेष्ठ का भक्ती श्रेष्ठ याचे विवरण केले. ज्या ठिकाणी नाम सर्वस्व आहे. सहज साधारण नाम म्हणजे भक्ती !
नाम कोणत्या तऱ्हेने झाले…
संताचे अभंग असे किर्तीरुप मागे राहतात. त्यांना भंग नाही. असताची किर्ती काही काळच मागे राहते, पण सताची किर्ती अभंग आहे. आतापर्यंत काही किर्तीरूप संतांनी विवरण केले आहे त्याला भंग आहे का? म्हणून अशा तऱ्हेने मानवाने जावे.
काही मानवांचे नाक मुरडणे काही गेलेले नाही. कारण त्यांना भक्तीचे मूळ सापडले नाही. ज्याच्या ठिकाणी द्वैत भक्ती आहे,…