Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे…©️

सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे…©️

या सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरु हा राजमार्ग आहे. त्या मार्गाने, सर्वस्व आपली कर्तव्ये सांभाळून गेला, तर जन्माला आल्याचे सार्थक होते.

आसनाला मानवाची मानवता सिद्ध करायची आहे. तो काळ समीप आला आहे. ज्याला आपण मानव आहोत याची ओळख पटेल, तोच खरा मानव !

आपणास शुभदिनी संदेश दिलेले आहेत. फार मोठे संघर्षण होणार आहे. त्याचे सत्य उजेडात येणार आहे. त्यासाठी या आसनाचे कार्य आहे. बाहेर पडण्याची वेळ आली आहे. आता जरी उज्वलता नसली, तरी कार्याचा फार मोठा भाग पुढे आहे. सत् हे सतच राहणार आहे ! त्याला कोणीही बाधा आणणार नाही. असत्याने काही जरी केले, तरी काहीही होणार नाही.

कोकण आसनाची परिस्थिती आता जरी अशी दिसत असली तरी पुढे काळ निराळा आहे. याच्या साठीच हे प्रयत्न आहेत. आपणाला संदेश दिले ते पार पाडावयाचे आहेत.

अघोर मानव षडरिपूच्या जाळ्यात गुरफटलेला असतो, म्हणून त्याला सताची ओळख नाही. अशांना कितीही उपदेश केला तरी तो पटणार नाही. अशांकडून आसनाला डिवचण्याचा प्रयत्न झाला तरी आपण नाराज व्हावयाचे नाही. आसनाचे श्रेष्ठत्व फार उच्च तऱ्हेचे आहे. आपण पहाल ! आसनाची अवहेलना करणाऱ्या मानवांना क्षमत्व नाही. कोठून काय होईल, हे सांगता येत नाही. अघोर मानवांचे कृत्यच अघोर. त्याला बळी पडावयाचे नाही. हे संदेश आहेत. (समाप्त)©️

You cannot copy content of this page