Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री विठ्ठल – सद्गुरु चलाख नसतील तर….सद्गुरुंना भोळसट करणारे तत्त्व दुसरे कोणतेही नाही. चलाख बनविणारेही तत्व नाही. ते स्वयमेव तत्व असल्यामुळे ते …

श्री समर्थ मालिक – मालिक वैकुंठी नाहीत. योगीयांच्या हृदयी नाहीत, तर मग मी कोठे असतो? तर मी सत् भक्तांच्या ठिकाणी असतो. तेथेच …

मी सगुण, मी निर्गुण ©️

मी सगुण, मी निर्गुण ©️

श्री समर्थ मालिक – सगुण निर्गुण आहे कसे अन् नाही कसे? जड आहे. स्थूल देह म्हणजे त्याला मानव म्हटले आहे. प्रकृती स्वयं आहे का? तर नाही. मी सगुण आहे, निर्गुण पण आहे. पण कोणाला? जो जाणेल त्याला. त्याला सांगण्याची आवश्यकता नाही.

आपल्या नादात गुंग असते ते कोण? जोपर्यंत भिन्नत्व नाही, तोपर्यंतच एकरूप असते, पण मायेची हवा लागल्यानंतरच विसर पडतो. विसर पडल्यानंतर सत् आणि प्रकृती भिन्न होते अन् मग वाटते मी कोणीतरी विशेष आहे. मी अमक्या तमक्याचा आहे. पण ईश्वराचे नाव सांगतो का? त्याचे सुकृत असेल तरच सत् सानिध्यात येतो. मग त्याला वळण लागते.

प्रथम तत्व आणि प्रकृती एकरूप झालेली असते. पण वयात आल्यानंतर एकरूप होणे कठीण पडते. मी सगुण आहे अन् निर्गुण पण आहे. प्रकृती ठायीच लय केल्यानंतर मग मी निर्गुण आहे की नाही? ही शक्ती मिळविण्यासाठी काही वर्षे लोटावी लागतील. सर्व ठिकाणी मी आहे अन् म्हणून आकाराला सोडून तत्त्व नाही. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page