Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री विठ्ठल – सद्गुरु चलाख नसतील तर….सद्गुरुंना भोळसट करणारे तत्त्व दुसरे कोणतेही नाही. चलाख बनविणारेही तत्व नाही. ते स्वयमेव तत्व असल्यामुळे ते …

श्री समर्थ मालिक – मालिक वैकुंठी नाहीत. योगीयांच्या हृदयी नाहीत, तर मग मी कोठे असतो? तर मी सत् भक्तांच्या ठिकाणी असतो. तेथेच …

अखंड तत्व अन ॐ कार बीज ©️

अखंड तत्व अन ॐ कार बीज ©️

अखंड तत्व अन ॐ कार बीज ही दोन तत्वे अमर आहेत. आहेत तीन, पण एक नाशिवंत आहे. जडत्व हे पाच तत्वांचे आहे. त्यामुळे हे पाच तत्वात मिलन करावे लागते. अमर दोन पदे आहेत, ती दिसणार नाहीत. ते अखंड तत्व अन ॐ कार बीज. या दोन्हीचा नाश कोणी केला आहे का?

ॐ कार म्हणजे काय? कुठून आले? कोणी निर्मिती केली? तर अखंड तत्व (निराकार), तेथून धूनधूनकार, अन् त्यापासून ॐ कार निर्माण झाला. तोच ओमकार, आकार, हा ओंकार स्वरूप झाला, मग प्रश्नच उरत नाही. मग तत्वासमान झाले.

प्रकृती आणि तत्व भिन्न आहे असे मानले, तर ॐ कार स्वरूप बनणे कठीण आहे. तत्व आणि प्रकृती एक झाली तर तू आणि मी वेगळा नाही. पण आताचा काळ मायावी आहे, म्हणून ॐ कार स्वरूप बनणे कठीण आहे. आसनाधिस्तांना मी काही अनुग्रह दिला नाही. फक्त माझा स्पर्श झाला आहे. (पुढे सुरु…२) ©️

You cannot copy content of this page