Skip to content Skip to sidebar Skip to footer

Author page: Admin

अवतार कार्य केव्हा नटविले जाते?©️

श्रीकृष्ण जयंती -  ज्या ज्या युगामध्ये मानव अघोरी कृत्य करून पराकोटीला जातात, त्या त्या वेळेला अवतार कार्य नटवावे लागते. कर्तव्याची आखणी आधीच झालेली असते. त्याप्रमाणे ते कर्तव्य अवतार कार्य नटवून पार पाडावे लागते. अवतार कार्याची गती जरी वेगळी असली तरी मानवाला प्रत्यक्ष कोण आहेत याची जाणीव देऊन कर्तव्याची पण संपूर्ण जाणीव दिलेली आहे. अनेक लिलेने…

Read More

तर कोण कोणाची विटंबना करेल काय? ©️

श्री समर्थ मालिक - बोलताना सेवेकरी बोलतो, "असे वाटते" अन् यावर चर्चा चालते. एकाने एकपट बोलले, तर दुसरा दसपट बोलतो. काही सेवेकरी अहंकारी आहेत. अहंकार शुद्ध सात्विक ठेवण्याचा प्रयत्न करा. सेवेकऱ्यांने असे म्हटले पाहिजे, मी तुझा आहे, तू माझा आहे. आपला जन्मदाता एकच आहे. याप्रमाणे चला म्हणजे वाद निर्माण होणार नाहीत. याप्रमाणे वाटचाल करा.…

Read More

मनातील तरंग दूर करा ©️

श्री समर्थ मालिक - मी नाही असा रिकामा ठाव नाही. संतांनी वर्णन केलेले आहे की, भगवंता शिवाय वृक्षाचे पानही हलत नाही. पवन सुटत नाही. पर्जन्य पडत नाही. सर्वस्व माझ्या सत्तेने होते. असे जर आहे, तर सेवेकर्‍यांनी आपल्या हृदयात याची खूणगाठ का बांधू नये? मी तू रहित का होऊ नये? मी तू रहित झाल्यानंतर सर्वांचे मन…

Read More

उघडीले मन सद्गुरुंनी !

श्री समर्थ मालिक - मनमिळाऊपणा - भाग एक मनमिळावू म्हणजे काय? मन हे केवढे आहे? किती मोठे, किती बारीक आहे? पकडले तर सापडते कां? मन कोठून व कोणापासून आहे? मन म्हणजे काय? ते दिसते काय? मन म्हणजेच माया ! माया दिसते कां? दिसे ते मायावी कसे? तत्व जे असे ते अविनाशी ! माया हि…

Read More

निराकारी कोण? आकारी कोण? ©️

श्री समर्थ मालिक - आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. या दरबारातील सेवेकरी अप्रकाशित नाहीत. अप्रकाशित म्हणावे तर ते बसल्यानंतर रममाण होतातच ! म्हणून अप्रकाशित म्हणता येणार नाहीत. पण जी गती पाहिजे, ती अजून मिळालेली नाही. कांही सेवेकर्‍यांनी पाठीमागे विचारले होते…

Read More

होणार हे होणारच ! ©️

श्री समर्थ मालिक - बोल बोलवितो कोण? हे ज्याने ओळखले त्यानेच ओळखले. ज्याने ओळखले नाही तो म्हणतो, “मीच शहाणा आहे.” पण मी मायेला किती मारून, त्याच्याकडून भरपाई करून घेत असतो. या भारत भूमीमध्ये किती अहंकार मातलेला आहे. त्या अहंकाराने कितीतरी मात केली आहे. गरीब लोकांची काय स्थिती आहे? म्हणून जे कर्तव्य घडवायचे ते घडवून घेणारच…

Read More

वेद अनंत बोलीला | ©️

श्री समर्थ मालिक - वेद अनंत बोलीला | अर्थ इतकाच काढीला || निजनिष्ठे नाम गावे | शरण विठ्ठलासी जावे || वेद म्हणजे काय? हा किती तऱ्हेने सुटतो? बोलाचा अंत सापडला आहे काय? बोल, प्रणव कोठून सुटतात? चैतन्याची घुसळण झाल्याशिवाय वेदना नाही. वेदना झाल्यानंतर प्रणव सुटतात. ह्यालाच वेद म्हणा अगर काही म्हणा ! हे कोठून,…

Read More

जो शांत, तोची संत | ©️

संत समागमे धरुनी आवडी | करावी तातडी परमार्थाची || श्री समर्थ मालिक - आत्ताच्या युगामध्ये संत मिळणे दुरापास्त आहे. ज्याला भक्तीचे मूळ पूर्णत्वाने सापडले तोच त्या ठिकाणी चिकटून राहिला. तो इकडे तिकडे भरकटत नाही. एकाच ठिकाणी बसून आपल्या तत्त्वाशी तद्रूप राहिल्यानंतर तो शांतच आहे. त्याला सर्वस्व सापडले आहे. त्याला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. तोच संत…

Read More

तत्त्वापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ©️

श्री समर्थ मालिक - ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात, त्यांची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या तऱ्हेचा आहे. हल्लीच्या काळात चमत्कार नमस्काराला भाळणारे मानव जास्त आहेत. सद्गुरु तत्व काय आहे, याची त्यांना माहिती नाही. ते समजतात, सद्गुरु हे मानव आहेत अन् परमेश्वर तत्त्व वेगळे आहे, अशी त्यांची भावना आहे…

Read More

मतलब साधण्यासाठीच सेवेकरी होऊ नये ©️

श्री समर्थ मालिक - सेवेकरी असून कर्तव्याची दिशा चुकला गेला तर आसनाने आसनाधिस्तांनी वशिला लावू नये. तो सात्विक असतो, पण तो मनाचे आधीन झाल्यानंतर रस्ता चुकतो. तेव्हा त्याला मार्गावर आणण्या करिता चुणूक दाखवावी लागते. या २०-२५ वर्षाचे काळात चमत्कार, नमस्कार कितीतरी दाखविले आहेत. ज्यांनी हे चमत्कार पाहिले, त्यापैकी किती ज्योती या ठिकाणी रममाण झाल्यात?…

Read More

श्री गुरु पौर्णिमा ©️

अलक एकचित्त - सेवेकरी अन् सद्गुरु हे नाते निराळे आहे. सेवेकरी वेगळा नाही. म्हणून सेवेकऱ्यांनो, बंधुभाव, प्रेम निर्माण झाले पाहिजे. सद्गुरूंनी दिलेला उपदेश ध्यानी बाळगून आचरणात आणणे, ठेवणे. समता म्हणजे सेवेकरी सद्गुरुंशी तादात्म्य होणे. ही समता सेवेकऱ्यात पाहिजे, बंधुभाव पाहिजे. (एकाच माता पित्याची मुले जशी वागतात तसे वागा) कोणत्याही तऱ्हेचे किल्मिष मनामध्ये असता कामा…

Read More

श्री सद्गुरु महिमा ©️

सद्गुरू पदोपदी आपणास प्रणव देत असतात की मन सद्गुरू चरणांवर बहाल करा. ज्या सद्गुरूंना शरण आहात तेच सत आहेत. जे सत तेच सद्गुरु! त्यांच्या मुखातून जे प्रणव मिळत असतात, ते सतमय प्रणव असतात. तेच प्रणव आपल्या सेवेकऱ्यांना कुठपर्यंत पोहोचवतात, तर सत चरणांप्रत पोहोचवतात. या भूतलावर अराजकता माजली…

Read More

You cannot copy content of this page