Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री विठ्ठल – सद्गुरु चलाख नसतील तर….सद्गुरुंना भोळसट करणारे तत्त्व दुसरे कोणतेही नाही. चलाख बनविणारेही तत्व नाही. ते स्वयमेव तत्व असल्यामुळे ते …

श्री समर्थ मालिक – मालिक वैकुंठी नाहीत. योगीयांच्या हृदयी नाहीत, तर मग मी कोठे असतो? तर मी सत् भक्तांच्या ठिकाणी असतो. तेथेच …

सद्गुरु महिमा ©️

सद्गुरु महिमा ©️

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा जाणा. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे, हा एक त्यांच्या चरणांचा कण आहे, मग सद्गुरु महिमेचा अंत त्याला सापडेल का? त्यांच्या लिलेचाच जर अंत सापडला नाही, तर त्यांचा अंत सापडणे दुरापास्त आहे. अनंत कोणी टोपी आहे ती ! मग त्यांच्या महिमेचा अंत लागेल का? तेव्हा सत भक्ताने, सत् सेवेकऱ्याने त्यांच्या महिमेचा, लिलेचा विषय घेण्याची जरुरी नाही, तर एकाच ठिकाणी, ज्यांना शरण आहात त्याच ठिकाणी संपूर्ण लीन झालात तर लिलेचाही अंत लागेल. सद्गुरु कसे आहेत हे सुद्धा त्यांना पाहता येईल. मग मात्र, सद्गुरु चरण त्यांना कुठे मिळतील? कसे मिळतील? सद्गुरु चरण कोठे आहेत? कसे सापडणार? कोठे जावयास पाहिजे? पंढरीला का त्या हिमालयात जावयास पाहिजे?

तीन ताळ, सप्त पाताळ, २१ स्वर्ग जरी फिरलात तरी सद्गुरु चरण सापडतील का? मग कुठे सापडतील? याचे उत्तर एकच, ते आपल्या हृदयाच्या ठिकाणीच सापडतील हे सत्य आहे. मात्र सेवेकरी कृतिमान पाहिजे. सेवेकरी त्या तऱ्हेने कृतिमान झाला, मग मात्र हृदयातच सद्गुरु चरण आहेत ते समजेल. हृदयातील सद्गुरु चरणात लीन होऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न करा. अगाध महिमा त्याच ठिकाणी पहावयास मिळेल. जोपर्यंत स्व:स्वरूपी लीन होत नाही, तोपर्यंत लिलेचे, महिमेचे वर्णन करता येणार नाही. एकच, चावी सापडली की, मग सर्वस्व वर्णन करता येईल. (पुढे सुरु….२)©️

You cannot copy content of this page