Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – प्रारब्धाप्रमाणे,पूर्व संचितानुसार त्यांनी आम्हाला आपल्या सानिध्यात घेतले आहे, अशा त्या माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी हे मना …

परमेश्वर वेगळे तत्व आहे कां?©️

परमेश्वर वेगळे तत्व आहे कां?©️

श्री समर्थ मालिक – मानव मनाच्या आधीन बनून उच्च आणि नीच या दृष्टिकोनातून चालला, मग मात्र सत् भक्ती मार्गातून तो फसला जातो. यामुळे त्याला सद्गती मिळणे फारच दुरापास्त असते ही मेख जाणणाऱ्यानेच जाणली आहे, अन् म्हणूनच ते मोक्षाचे वाटेकरी झाले.

हल्लीच्या काळात गुरु म्हणजे वेगळे तत्व व परमेश्वर म्हणजे वेगळे तत्व आहे असे म्हणणारे मानव आहेत.

मन जे आहे, ते म्हणजेच माया ! म्हणजेच प्रकृती ! पंचमहाभूतांचे कवच, त्यामध्ये ते शांत, धीर, गंभीर बसलेले आहेत, त्या सताच्या चेतनेनेच ही प्रकृती मजा लुटते. चैन करते. तेच सत, या प्रकृतीच्या अंगाला मौजमजा लुटू देते व आपण चुपचाप राहते, पण त्यांचे पूर्णत्वाने लक्ष असते कि हे कुठपर्यंत धावते? पण जी प्रकृती नाममय, शुद्ध स्फटिकासारखी आहे, त्या आकाराला मार्गावर आणण्याचा तेच प्रयत्न करतात. जो आकार आहे, जडत्व आहे, पंचमहाभूतांचे कवच आहे, त्यातच मी राहतो, म्हणजेच माझे वास्तव्य आहे. त्यामुळे सर्वस्व शुद्ध, अशुद्ध, त्यांना माहीत असते. त्याचप्रमाणे पूर्वजन्मीचे संचित, प्रकृतीचे किती आहे, याची पूर्णत्वाने जाणीव त्यांना असते. त्याच्याच अनुरोधाने ते त्यांना शुद्धीवर आणून मार्गस्थ करतात. (पुढे सुरु…२)©️

You cannot copy content of this page