– श्री समर्थ मालिक प्रवचन – सद्गुरु ! सद्गुरु ! सद्गुरु म्हणजे तरी काय? अन् हे कसे आहेत? सत् आणि गुरु ! सत् सोडून गुरु ही दोन अक्षरे आहेत. सताला आकार नाही, गुरुला आकार आहे. पुढे संस्कृत श्लोकच आहे –
गुकारो प्रथमो वर्णा, मायादी गुण भासका | सकारम् द्वितीय ब्रह्मा | माया भ्रांती विमोचक: || म्हणून जे सत् आहे, तेच पूर्ण प्रकाशात फेकतात, अन् ते सुद्धा आकाराला धरूनच ! म्हणून आकारातच ते तत्व आहे. कारण ते आकार अन् निराकार एकरूप झालेले असतात. ते अन् हे वेगळे नाहीत. म्हणून आकाराचीच पूजा केल्याशिवाय हे काही एक (निराकार) मिळणार नाही. ज्या आकाराला आपण शरण आहात, त्याच आकाराला ओळखावे हे सेवेकऱ्यांचे आद्य कर्तव्य आहे. अन् आकाराच्या ठिकाणी तुम्ही पूर्णत्वाने ठाम आणि श्रद्धायुक्त असाल तर मग ओळखण्याची आवश्यकताही नाही. (समाप्त) ©️
