Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

इंद्रियांना वळण ©️

इंद्रियांना वळण ©️

इंद्रियांना वळण कसे आणि कोणत्या रितीचे आणि कोणत्या नाही हा प्रश्न आहे. जी ज्योत भक्तित, सद्गुरु चरणात लिन झाली असेल, त्यांच्या इंद्रियाचे वळण कसे असते म्हणून त्यांनी सांगितले? पडीले वळण इंद्रिया सकळा ! त्याला जिकडे पहावे तिकडे सतच सत् विखुरलेले दिसत होते. त्यांची इंद्रियें सद्गुरुमय झालेली होती. त्याचा भाव निराळा नाही. त्या संताने असे म्हटले त्याप्रमाणे खरे होते की नाही? त्याचे रोम रोम सर्वस्व सतमय झाले होते. या पृथ्वीतलावर प्रकृती किती आहेत? व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. पण प्रकृती अभिन्न होईल तर एकच वळण लागेल. तुकोबाच्या म्हणण्याप्रमाणे मग सोपे आहे की नाही?

प्रकृतीच्या वळणाप्रमाणे हरएक मानव जातो. प्रत्येकाचे वळण निरनिराळे असते. जो असत मार्गी जातो, त्याच्या इंद्रियांना असत वळण लागते. जशी ज्याची मनोभावना, तशी गती मिळते. जो खरोखर यात रममाण झाला, त्याच्यात आणि असत भक्तिच्या मानवात जमीन अस्मानाचा फरक असतो. सत भक्तीने जाणारा माझ्या प्रत येतो आणि असत भक्तीने जाणारा माझ्या प्रत येत नाही, म्हणून असत भक्तिने जाणारा कदापिही माझ्याजवळ येणार नाही.©️

You cannot copy content of this page