परब्रम्ह तत्व आपल्या ठायीच सर्वभूतेषु भरलेले आहे अन् भरून सुद्धा अलिप्त आहे. त्याचा शोध घ्यावयाचा आहे. पण ॐ कार स्वरूप बनल्याशिवाय थांग लागणे कठीण आहे. आकाराला पुजल्याशिवाय निराकाराची ओळख होणार नाही. जे आकारी आहेत, त्यालाच ॐ कार स्वरूप हे नामाभिधान आहे.
याची वाढ कोणी करावयाची? मानवी तऱ्हेने त्रास झाला तर आसना जवळ सांगता, पण…
श्री समर्थ मालिक - यश हे अवश्य आहे, पण कधी कधी सत् सेवेकऱ्याला असताचे चटके बसतात. त्याला असताचे चटके बसून बसून यश हे आपोआप निर्माण होते. मात्र त्याला हे कळत नाही कि हे यश कशापासून मिळाले. हर्षयुक्त झाला की त्याला वाटते हे मीच करतो. पण यश आल्यानंतरच त्याची हर्षयुक्त भावना असते. पण जोपर्यंत कर्तव्य होत…
श्री संत नामदेव महाराज - सद्गुरु क्षणात निराकारी बनतील, क्षणात आकार धारण करतील. सदोदित स्थानवंत असे हे तत्व आहे. असे असून सुद्धा, निर्गुण निराकार पदानेही व्यवहार करतात. माझ्यासारख्या सेवेकऱ्याने आणखी किती वर्णन करावे? म्हणून येथील सेवेकरी महान भाग्यवान आहेत. कोणी सद्गुरूंचा अंत लावला आहे का? कोणी म्हणतो आम्हाला दर्शन नाही, कोणी म्हणतो प्रकाश…
श्री संत नामदेव महाराज - ज्याने या सर्वस्व ब्रह्मांडाची रचना केली, आकाश, पृथ्वी, सर्वस्व सृष्टीची रचना केली, ते तत्व आमच्या सारख्या अज्ञानी सेवेकऱ्यांना म्हणतात, “काहीतरी सांगा.” पण मी काय सांगावे? अनंत लाघवी तत्व, न धरता येणारे, न सापडणारे, अशांचे गुणवर्णन करणे, त्यांच्याविषयी भक्तीयुक्त प्रवचन सांगणे, म्हणजे त्यांच्या भक्ती विषयी मी काय सांगणार? माझ्या सद्गुरुं पेक्षा…
श्री समर्थ मालिक - गीतेत म्हटले आहे, “मन्नाथो श्री जगन्नाथो | मद् गुरु श्री जगद्गुरु || सर्वात्मा सर्व भूतात्मा | तस्मै श्री गुरुवे नमः || मग माझा भगवंत वेगळा अन् त्याचा वेगळा असे होईल का? प्रकृती वेगळी असल्याकारणाने विशेष काही वाटते, म्हणून आकार निरनिराळा आहे आणि आकार हाच निराकारापर्यंत पोहचवू शकतो.
मानवांना हे समजत…
श्री समर्थ मालिक - भक्त हा भगवंतावर अन् भगवंत हे भक्तावर अवलंबून असतात. भक्ती प्रेम निर्माण झाले की मनाची चंचलता आपोआप दूर होते. जोपर्यंत मनाची शुद्धता नाही, तोपर्यंत भक्ती ही कठीण वाटते. मन शुद्ध झाले की भक्तीत कठीणता नाही.
सर्वभूतेषु एकच तत्व आहे, पण अनंत रूपे अनंत नामे याने नटलेली महामाया ही नटविली कोणी?…
श्री समर्थ मालिक - अनुग्रह मिळण्यासाठी प्रथम भक्तीचे वळण लागते. पूर्व संचिताप्रमाणे भक्ताचे कर्मसंचित दूर सारून त्याला सानिध्यात घेतले जाते. मग त्याची ती ठाम कृती कितपत आहे हे पहावयाचे असते. ज्या ज्योतीला अनुग्रह पाहिजे आहे, त्या ज्योतीने सत् गतीत राहिले पाहिजे.
सेवेकर्यांना, महान महान तत्वांना, ऋषी मुनींना अनुग्रहाची गती आहे. अनुग्रह दिल्यानंतर ॐ काराचे…
सेवेकरी ठाम आहेत. जे होणार आहे, ते कधीही चुकणार नाही. जी घडण घडणार असेल, ती घडल्याशिवाय राहणार नाही. सर्वत्र अघोर, आप मतलबी, वाईट वर्तणूक, गरीबांकडे दुर्लक्ष, स्वतःचा स्वार्थ साधूपणा याला ऊत आलेला आहे. या अघोरांनी जास्त थैमान घातलेले आहे. याची घुसळण केल्याशिवाय काही होणार नाही, या मानवांकडून काहीतरी पाप घडल्याशिवाय गत्यंतर नाही, म्हणून हे…
श्री समर्थ मालिक - त्यावेळचा काळ आणि आत्ताचा काळ यात बराच फरक आहे. त्या काळामध्ये जसा सेवेकरी बोलत होता, त्याप्रमाणे त्याचे कर्तव्य होत होते. त्याप्रमाणे वागत होते, पण आत्ताच्या सेवेकऱ्यांचे बोलणे जास्त पण कृती कमी अशी तऱ्हा आहे.
याचे कारण काय? हल्लीचा काळ, हवामान हे तशा तऱ्हेचे आहे, म्हणून प्रत्यक्षात आणि अप्रत्यक्षात अंतर हे…
ज्या वेळेला अखंड तत्वाने संदेश सोडले, ॐ कारेश्वराला बोलवा, चैतन्य उडवले होते, त्या वेळेला मातेचा धावा केला, तिथपासून आठवण नाही.
मी फक्त तसबिरीतच आहे का? म्हणून सेवेकरी कसा आहे, कसा नाही हे मी ओळखले आणि म्हणूनच पूर्व जन्मीचे सत् कृत्य अखंड होते म्हणून हिमालयात बसवले. तेव्हा भगवी वस्त्रे होती. म्हणून हे कर्तव्य इतरांकडून होणार…
अखंड तत्व अन ॐ कार बीज ही दोन तत्वे अमर आहेत. आहेत तीन, पण एक नाशिवंत आहे. जडत्व हे पाच तत्वांचे आहे. त्यामुळे हे पाच तत्वात मिलन करावे लागते. अमर दोन पदे आहेत, ती दिसणार नाहीत. ते अखंड तत्व अन ॐ कार बीज. या दोन्हीचा नाश कोणी केला आहे का?
ॐ कार म्हणजे काय?…
श्री समर्थ मालिक - सगुण निर्गुण आहे कसे अन् नाही कसे? जड आहे. स्थूल देह म्हणजे त्याला मानव म्हटले आहे. प्रकृती स्वयं आहे का? तर नाही. मी सगुण आहे, निर्गुण पण आहे. पण कोणाला? जो जाणेल त्याला. त्याला सांगण्याची आवश्यकता नाही.
आपल्या नादात गुंग असते ते कोण? जोपर्यंत भिन्नत्व नाही, तोपर्यंतच एकरूप असते, पण…