Skip to content Skip to sidebar Skip to footer

Author page: Admin

माझे माझे …©️

एखादा महान भक्त किंवा सेवेकरी अह:र्निश सद्गुरु ध्यानात नामात तल्लीन असतात, रात्रंदिवस कष्ट केलेले असतात. थोडक्यात, शेवट शेवट मुक्ती मोक्ष मिळण्याचा संभव असतो. अशी वेळ जवळ आली असताना, त्याला कशी आशा सुटते? तो कोणत्या रस्त्याने जातो? तर त्याला मायेची आशा लागते. थोडासा सताचा विसर पडल्यानंतर हे माझे, ही माझी जमीन, माझा पैसा सर्व माझे माझे…

Read More

संसाराचे सार ©️

श्री समर्थ मालिक - जो नारायणाच्या ध्यानात तल्लीन झाला त्याला सुखदुःखाचे वर्णन करता येणार नाही. त्याला त्याची वाक्यरचना करता येणार नाही. सुखदुःख कशाला म्हटले आहे? आत्ता तुम्ही या ठिकाणी आलात मग दिवसभर काय करता? कोणाला सुख आहे? ज्याच्या घरी कोट्यांनी संपत्ती आहे तो तरी सुखी आहे का? जो रात्रंदिवस दोन मिनिटे म्हणा, दोन सेकंद म्हणा…

Read More

भोगत्व ©️

श्री समर्थ मालिक - आता आत्मरूपाची गती कोणाला माहित नाही? मग दोष कोणामुळे होतो? माझ्यापासून होतो का? ही प्रकृती जीवनाच्या मुशीत आल्यानंतर हजारो गुन्हे होतात. ते त्याच्या संचितात रुजू होतात. ते भोगत्व त्याला भोगल्याशिवाय सुटत नाही. मग पुढे दोष लावायचा कुणाला? तर नारायणाला. पण नारायण तसा ऐकणार आहे का? नारायणाचा दोषच नाही. स्वतःची चूक…

Read More

चैतन्य ! ©️

चैतन्य ! सर्व ठिकाणी भरून उरलेले, परात आहे त्याच्याही पलीकडे आहे. चरातही आहे आणि परातही आहे. सर्व ठिकाणी आहे. पाहणाऱ्याला पाहता येते, न पाहणाऱ्याला सापडत नाही. अशी ही चैतन्यमय स्थिती सेवेकरी अनुभवतात. इतर मानवांना त्याचा अनुभव नाही. अनुभवाशिवाय गोडी लागेल का? हेच जडत्व, ध्यानात लागल्यानंतर विसरले जाते. त्याला कशाचीही शुद्ध राहत नाही. चैतन्य ! सर्व…

Read More

मी कसा आहे ? -२-©️

तर निर्विकारापासून निर्मिती ! प्रथम चैतन्य निर्विकार, तेथून धुनधुनकार, येथून ओंकार म्हणजेच आकार निर्माण झाला. आकार निर्माण करावा लागला. आकार निर्माण केला कोणी? आकार हेच ओंकार ! पण तो आकार ओंकार स्वरूपी बनला तर ! ॐकार स्वरूपी बनल्यानंतर त्याच्यापासून सृष्टीची रचना झाली. ॐ कारा पासून माया म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिगुण निर्माण झाले. तदनंतर…

Read More

मी कसा आहे? ©️

श्री समर्थ मालिक - मी कसा आहे? अंगुष्ठमात्र आहे. अंगुष्ठमात्र म्हटले आहे. जसे म्हणाल तसा आहे. तर कसा आहे? चिन्मय आहे. चैतन्यमय आहे. चैतन्यमय स्थिती नसेल तर सेवेकरी काही करू शकेल का? या चिन्मय स्थितीवर कोणाचा भरवसा आहे, तर कोणाचा नाही. मग मी कसा आहे? मला आदी नाही, मध्य नाही आणि अंत पण नाही. रंग…

Read More

इंद्रियांना वळण २

संतांनी स्वतःचा अनुभव सांगितला. जो भक्तित रममाण झाला, त्याला लबाड, दुश्मन, चांडाळ दिसत नाही. पापपुण्य समजत नाही. तो एकातच रममाण झालेला असतो. ते संत, रात्रंदिवस सद्गुरु ध्यानात निमग्न झाले होते. पण प्रकृतीचा तरी अंत लागलेला आहे का? प्रकृतीत कोण वास करतो, हे कोणी पाहिले आहे का? अघोर मानव अघोर भक्तिने जातो, त्याला नमस्कार चमत्कार पाहायला…

Read More

इंद्रियांना वळण ©️

इंद्रियांना वळण कसे आणि कोणत्या रितीचे आणि कोणत्या नाही हा प्रश्न आहे. जी ज्योत भक्तित, सद्गुरु चरणात लिन झाली असेल, त्यांच्या इंद्रियाचे वळण कसे असते म्हणून त्यांनी सांगितले? पडीले वळण इंद्रिया सकळा ! त्याला जिकडे पहावे तिकडे सतच सत् विखुरलेले दिसत होते. त्यांची इंद्रियें सद्गुरुमय झालेली होती. त्याचा भाव निराळा नाही. त्या संताने असे म्हटले…

Read More

अखंड सेवा २ ©️

पूर्वीच्या युगात महान महान सेवेकरी होते. ते अखंड सेवेत, गतीत निमग्न झाले, सेवामय झाले, भक्तीमय झाले. त्याप्रमाणे आताच्या युगात कोणी दिसत नाही. आहे कोणी असा की ज्याची तिजोरी भरून वाहत चालली आहे. अखंड असे सत्पुरुष आहेत का? पण ते ऋद्धी सिद्धीच्या पाठीमागे आहेत. ते मानवांना चमत्कार दाखविण्यासाठी, नावाला हपापलेले असतात. भक्तीला असे काही एक लागत…

Read More

अखंड सेवा ©️

श्री समर्थ मालिक - अखंड सेवा ही दिलेलीच असते. परत मागण्याची जरुरी नसते. ती दिलेली असते. सेवेकऱ्यांना ती टिकविता येत नाही, म्हणून त्यांना असे वाटते आणि जरी नसेल, तरी मालिक, सद्गुरु हे देतातच. दिलेल्या प्रमाणे सेवेकऱ्याने ती सेवा टिकविली पाहिजे. अखंड सेवा दिली आहे, पण त्या अखंडत्वाचा उपभोग घेता आला पाहिजे. ज्याला कधीही खंड…

Read More

सद्गुरु म्हणजे तरी काय? ©️

- श्री समर्थ मालिक प्रवचन - सद्गुरु ! सद्गुरु ! सद्गुरु म्हणजे तरी काय? अन् हे कसे आहेत? सत् आणि गुरु ! सत् सोडून गुरु ही दोन अक्षरे आहेत. सताला आकार नाही, गुरुला आकार आहे. पुढे संस्कृत श्लोकच आहे - गुकारो प्रथमो वर्णा, मायादी गुण भासका | सकारम् द्वितीय ब्रह्मा | माया भ्रांती…

Read More

सद्गुरु महिमा २ ©️

श्री एकनाथ महाराज - आम्ही, माझ्या समर्थांच्या कृपेने त्यांच्या चरणात लीन होतो म्हणूनच गती मिळते. तेच सर्वस्वाचे निधान आहेत. मी, माझे समर्थ जनार्दन स्वामी, त्यांना मी सर्वस्व वाहिले होते. त्याप्रमाणे आमची ठेवण होती. मग दुसरीकडे भटकण्याची आवश्यकता काय? ज्या आकाराला शरण तेच ॐ कार स्वरूप आहेत म्हणून, ॐ कार बीज मात्रेण | नित्यम्…

Read More

You cannot copy content of this page