Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

संसाराचे सार ©️

संसाराचे सार ©️

श्री समर्थ मालिक – जो नारायणाच्या ध्यानात तल्लीन झाला त्याला सुखदुःखाचे वर्णन करता येणार नाही. त्याला त्याची वाक्यरचना करता येणार नाही. सुखदुःख कशाला म्हटले आहे? आत्ता तुम्ही या ठिकाणी आलात मग दिवसभर काय करता? कोणाला सुख आहे? ज्याच्या घरी कोट्यांनी संपत्ती आहे तो तरी सुखी आहे का? जो रात्रंदिवस दोन मिनिटे म्हणा, दोन सेकंद म्हणा माझ्या ध्यानात तल्लीन झाला तरी तो सुखी आहे. प्रत्येक सेवेकर्‍यांने असे होण्याचा प्रयत्न करा. मग नारायणावर बोल ठेवावा की न ठेवावा हे सर्वच सेवेकऱ्यांना कळेल.

या दरबारचे सेवेकरी अनुभव घेत आहेत. तेव्हा या चरणांवर थोडेसे सांगितले. यावर विचार करा. मग दोष कोणाचा आहे? करावे तसे भरावे असे जर नसेल, तर मायेला चेतना नाही दिली, तर व्यवहार चालणार नाही. सेवेकरी कृतीत उतरविणार नाही. मायावी रूपातच संसाराचे सार आहे. याच्या रहित मानवाला ठेवल्यानंतर तो संसार करणार नाही. पण माणसे स्वतःच खड्ड्यात उतरतात. पापाचे डोंगर साठवितात. याकरिता त्याला जन्माला घातला नाही. मानव हाच जगात, त्रिभुवनात श्रेष्ठ आहे. म्हणूनच तो माझ्या ध्यानाचा, नामाचा, वर्णनाचा उहापोह करतो. म्हणून मानव धर्म, मानव जन्म पवित्र आणि श्रेष्ठ आहे. ते श्रेष्ठत्व टिकविण्याचा प्रयत्न करणे आद्य कर्तव्य आहे. त्याप्रमाणे वाटचाल करणे. नारायणाला बोल द्यावा न द्यावा हे सेवेकऱ्याने पाहणे. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page