Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

भोगत्व ©️

भोगत्व ©️

श्री समर्थ मालिक – आता आत्मरूपाची गती कोणाला माहित नाही? मग दोष कोणामुळे होतो? माझ्यापासून होतो का? ही प्रकृती जीवनाच्या मुशीत आल्यानंतर हजारो गुन्हे होतात. ते त्याच्या संचितात रुजू होतात. ते भोगत्व त्याला भोगल्याशिवाय सुटत नाही. मग पुढे दोष लावायचा कुणाला? तर नारायणाला. पण नारायण तसा ऐकणार आहे का? नारायणाचा दोषच नाही. स्वतःची चूक मानवाला दिसत नाही. तो म्हणतो, दुसऱ्याच ठिकाणी आहे त्याला उपाय काय? स्वतःची एक चूक दडविण्यासाठी दुसरी चूक करतो. म्हणजे संचित वाढते. मग हे नारायण सांगतात का? पण चुक दडविण्यासाठी लपवा छपवी, इकडचा प्रणव तिकडे असे दरबारच्या सेवेकर्‍यांनी करू नये. हे संदेश आहेत आणि नारायणावर दोष देऊ नये. ज्याला गती नाही त्यांनी दिले तर देऊ द्यात. काही सेवेकर्‍यांचे किंवा मानवांचे म्हणणे असेही आहे की, परमेश्वर सर्वांच्या हृदयी आहे. त्याने आम्हाला अशी गति का द्यावी? अशी बुद्धी का द्यावी? पण जी घडण घडते, आतून बोल सुटतात त्याकडे मानवाने लक्ष दिले आहे का? म्हणून संतांनी म्हटले आहे, नारायणाच्या नावाने ओरडून काही जमणार नाही. स्वतःच्या सुखदुःखाचा वाटेकरी स्वतःच होतो. त्यांनी ते स्वतःच निवारले पाहिजे. सत मार्गाने, सत भक्तीने मानव गेला तर संचिताचे वाटेकरी नारायण होतात व थोडासाच भाग भक्ताला भोगावयास लावतात. थोडासा मात्र जरी भोगावयास लावला तरी त्याला नको जन्म होतो. पण सेवेकरी भक्तीत परिपूर्ण रममाण असेल तर तो सुखदुःखाची व्याख्या करू शकणार नाही. पण असा सेवेकरी होणे दुरापास्त आहे. ©️

You cannot copy content of this page