श्री समर्थ मालिक – अनुग्रह मिळण्यासाठी प्रथम भक्तीचे वळण लागते. पूर्व संचिताप्रमाणे भक्ताचे कर्मसंचित दूर सारून त्याला सानिध्यात घेतले जाते. मग त्याची ती ठाम कृती कितपत आहे हे पहावयाचे असते. ज्या ज्योतीला अनुग्रह पाहिजे आहे, त्या ज्योतीने सत् गतीत राहिले पाहिजे.
सेवेकर्यांना, महान महान तत्वांना, ऋषी मुनींना अनुग्रहाची गती आहे. अनुग्रह दिल्यानंतर ॐ काराचे बीजारोपण याचे प्रथम निवेदन दिले जाते. आदेश सुटल्यानंतर अनुग्रह होतो अन् नंतर तो सेवेकरी बनतो.
अखंड तत्व म्हणजे सद्गुरु – जे आसनावर आरुढ आहेत ते ! एकमेकांच्या हाताला धरून जावयाचे, गती घ्यावयाची कि मी कसा आहे? सद्गुरु म्हणजे काय? मानवांना मानवाप्रमाणे सांगावयास पाहिजे. कारण काही जुने अनुग्रहित आहेत.
प्रथम अनुचे वळण लागावयास पाहिजे. नंतर अणूच्याही पलीकडे जावयाचे आहे. पण धीर धरा. आपण सर्वस्व एकच आहोत असे सेवेकरी का म्हणत नाहीत? मला अनुग्रह झाला म्हणजे सेवेकरी हुरळतो, आनंदीत होतो. तर जे हुरळत नाही, आनंदीत होत नाहीत असे ते तत्व आहे. सर्व ठिकाणी भरूनही उरले आहे. ज्यांना अनुग्रह झाला, त्यांना माहित आहे. बाकीच्यांना कर्म संचिताप्रमाणे मिळणार आहे. (समाप्त) ©️
